शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

सराफा बंदचा लग्नसराईवर परिणाम

By admin | Updated: April 7, 2016 00:38 IST

उत्पादन शुल्कात वाढ करण्याच्या विरोधात सराफा व्यावसायिकांनी बेमुदत बंद पुकारला आहे.

कोट्यवधींची उलाढाल ठप्प : दागदागिन्यांविनाच लग्न उरकण्याची पाळीचंद्रपूर : उत्पादन शुल्कात वाढ करण्याच्या विरोधात सराफा व्यावसायिकांनी बेमुदत बंद पुकारला आहे. या बंदमुळे जिल्ह्यात दररोज कोट्यवधींची उलाढाल ठप्प झाली आहे. आता याचा थेट फटका लग्नसराईलाही बसत आहे. दागदागिन्याविनाच लग्न उरकण्याची पाळी अनेकांवर आली आहे. याशिवाय नागरिकांच्या आर्थिक जुळवाजुळवीवरही सराफा बंदचा परिणाम होत आहे.शासनाने सोनेचांदी व्यवहारातील उत्पादन शुल्कात १ टक्का वाढ केली आहे. याचा परिणाम सोनेचांदी खरेदीवर होऊन ग्राहकांनाही झळ बसणार आहे. त्यामुळे हे शुल्क रद्द करावे, या मागणीसाठी देशभरात सराफा व्यावसायिकांनी बंद पुकारला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही २ मार्चपासून हा बंद पाळण्यात आला आहे. शहरातील अगदी गल्लीबोळातील सराफा दुकान २ मार्चपासून बंद आहे. उल्लेखनीय बाब अशी की जिल्ह्यातील विशेषत: जिवती, कोरपनासारख्या मागास भागातील लहानसहान सोनेचांदीच्या दुकानांनीही हा बंद गांभीर्याने पाळला आहे. जिल्ह्यात कोणतेही सराफा दुकान सुरू नाही. सराफा दुकानांमधून दररोज जिल्ह्यात कोट्यवधींची उलाढाल होते. तब्बल एक महिन्यांपासून ही उलाढाल ठप्प आहे. यात सराफा व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.आता एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा लोटत आहे. लग्नसराईची धामधूम सुरू झाली आहे. लग्नात सोनेचांदीच्या दागदागिन्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात होते. अनेकवेळा वरमंडळीचा दागिन्यांसाठी हट्ट असतो. तो वधुपिते पुरविताना दिसून येतात. मात्र आता सराफा दुकानेच बंद असल्याने वधू व वरांकडील मंडळींची मोठी गैरसोय होत आहे. संपूर्ण देशभरातीलच दुकाने बंद असल्याने दागिने कुठून करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वधुचा श्रृंगार दागिन्यानेच पूर्ण होतो, असे म्हटले जाते. मात्र दागिने घेताच येत नसल्याने मोठी तारांबळ उडत आहे. अनेक नववधुंना कुटुंबातील वडीलधाऱ्या महिलांचे दागिने घालून बोहल्यावर चढविले जात आहे. लग्नसमारंभातील महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे मंगळसुत्र. तेसुध्दा करून द्यायला सुवर्णकार उपलब्ध नसल्याने बेन्टेक्ससारख्या धातूचे मंगळसुत्र खरेदी करून लग्नसमारंभ पार पाडावा लागत आहे. या सर्व प्रकारामुळे अनेकांची धावपळ होत आहे. (शहर प्रतिनिधी)मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूचचंद्रपूर जिल्ह्यातील सराफा व्यापाऱ्यांनी २ मार्चपासून बंद पुकारला आहे. दरम्यान असोसिएशनचे पदाधिकारी व शासन यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत काही निर्णय घेण्यात आले. यात संभ्रम निर्माण झाल्याने चंद्रपूर जिल्ह्यात २१ आणि २२ मार्चला दुकाने सुरू करण्यात आली. मात्र या बैठकीत मागणी पूर्ण न झाल्याचे वरिष्ठ पातळीवरून सांगण्यात आल्याने जिल्ह्यात २३ मार्चपासून पुन्हा बंद पाळण्यात आला, अशी माहिती संघटनेचे सत्यम सोनी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. आर्थिक तडजोडीवरही परिणामसध्या शेतीची कामे बंद आहेत. अनेकांच्या हाताला काम नाही. सोबतच लग्नसराई आहे. त्यामुळे अनेकांना पैशाची गरज पडते. सराफा दुकाने सुरू असली की अनेकांना घरातील सोनेचांदी गहान ठेवून कर्ज उचलता येते. प्रत्येक गावात नागरिक असे करताना व आर्थिक जुळवाजुळव करताना यापूर्वी दिसून यायचे. आता मात्र सराफा दुकाने बंद असल्याने त्यांचीही गैरसोय होत आहे. लक्ष वेधण्यासाठी कॅन्डल मार्च२ मार्चपासून आंदोलन सुरू असूनही शासनाकडून दखल घेतली जात नसल्याचे पाहून सराफा व्यावसायिक विविध आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधत आहेत. आज बुधवारी चंद्रपूर जिल्हा सराफा व स्वर्णकार बचाव आंदोलनच्या वतीने चंद्रपुरात कॅन्डल मार्च काढण्यात आला. सराफा बाजार ते जटपुरा गेट आणि पुन्हा सराफा बाजारात येऊन कॅन्डल मार्चचा समारोप करण्यात आला. यावेळी संघटनेचे राजेंद्र लोढा, मरजी लोणावत, भरत लोढे, ओमप्रकाश सोनी, समीर आकोजवार आदी व्यापारी सहभागी झाले होते.