शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
2
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
3
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
4
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
5
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
6
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
7
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
8
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
9
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
10
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
11
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
12
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
13
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
14
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
15
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
16
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
17
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
18
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
19
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
20
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
Daily Top 2Weekly Top 5

बल्लारपूरला स्मार्ट सिटी करण्याचा संकल्प

By admin | Updated: June 28, 2015 01:57 IST

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे. विकासात्मक कामाचा दर्जा सुधारण्यासाठी लोकसहभाग

बल्लारपूर : शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध आहे. विकासात्मक कामाचा दर्जा सुधारण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. यासाठी सर्व विकासावर नियंत्रण ठेवण्यासाठी समित्या गठीत करण्याचा मानस आहे. जनतेच्या मनात कायमस्वरूपी राहणाऱ्या कामावर भर देणार असून बल्लारपूरला स्मार्ट सिटी करण्याचा संकल्प अर्थ, नियोजन व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी येथे जाहिर केला. दरम्यान, नगरपालिका प्रशासनाने त्यांच्याकडे १२२ कोटी ८८ लाखांचा विकास आराखडा सुपूर्द केला.येथील श्री बालाजी सभागृहात बल्लारपूर शहर विकास आराखडा तयार करण्याच्या अनुषंगाने ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी विकास परिषद आयोजित करण्यात आली. त्यावेळी त्यांनी विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे आश्वासन दिले.यावेळी मंचावर नगराध्यक्ष छाया मडावी, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, नगर परिषदेचे उपाध्यक्ष संपत कोरडे, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, नगरसेवक रेणुका दुधे, हरिश शर्मा, विनोद यादव, डॉ. सुनिल कुल्दीवार, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती देवराव भोंगळे, प्रमोद कडू, शिवचंद द्विवेदी, निलेश खरबडे, उपविभागीय अधिकारी कल्पना नीळ-ठुबे, मुख्याधिकारी जी.एन. वाहूरवाघ, तहसीलदार डी.एस. भोयर, न.प. गटनेता देवेंद्र आर्य, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. राजू भुजबळ यांच्यासह अधिकारी व नगरसेवकांची उपस्थिती होती.ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले, कोणताही विकास करणे एकट्याचे काम नाही. सर्वसमावेशक टिमवर्क विकासात महत्त्वाची भूमिका पार पाडू शकते. शहरात वास्तव्याला असणाऱ्या नागरिकांचे ब्ल्यू प्रिंट तयार करण्याचे काम हाती घेणार आहे. रस्ते बांधकाम, आरोग्य सेवा, प्रदूषण, वृक्षारोपण, दिवाबत्तीची सोय, क्रीडांगण, सांस्कृतिक क्षेत्र यासह अनेक ठिकाणी समित्यांचे गठन करून त्या त्या विभागातील अधिकाऱ्यांच्या बैठकीत अहवालानुसार विकासाला चालना देण्याचा प्रयत्न करणार आहे. यामुळे लोकसहभाग वाढीव लागेल, असा विश्वास व्यक्त करून १७ कोटी रुपये खर्च करून अद्यावत पोलीस ठाणे बनविण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी जी.एन. वाहूरवाघ व नगराध्यक्ष छाया मडावी यांनी बल्लारपूर शहराचा सन २०१४-१५ चा एकूण १२१ कोटी ८८ लाख रुपयाचा विकास आराखडा पालकमंत्र्याकडे व जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. यात प्रस्तावित रस्त्याचे काम, मजबुतीकरण, रूंदीकरण, गटारे व मोठे नाले बांधकाम, आठवडी बाजारातील व्यापारी संकुल, वाहनतळ बांधकाम, मुख्य मार्गावर दोन स्वागत गेट, स्मशानभूमि विकास, वर्धा नदीवर घाटाचे बांधकाम, शहरात सी.सी.टी.व्ही. कॅमेरे, शालेय इमारतीचे नूतनीकरण, बचत भवनाचे नूतनीकरण, शहरातील चौकाचे सौंदर्यीकरण आदी कामांचा समावेश आहे.निलेश खरबडे, हरिश शर्मा व अन्य उपस्थित नागरिकांनी विकास परिषदेदरम्यान शहर विकासाबाबत काही सूचना केल्या. अनेकांनी निवेदनाच्या माध्यमातून विकासाला हातभार लावण्यासाठी भूमिका मांडल्या. संचालन नगरपालिकेचे अधीक्षक किशोर जांभुळकर यांनी केले. अधिकारी, कर्मचारी व नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. (शहर प्रतिनिधी)