शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
3
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
4
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
5
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
6
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
7
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
8
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
9
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
10
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
11
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
12
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
13
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
14
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
15
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
16
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
17
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
18
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
19
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
20
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

अल्ट्राटेक फाउंडेशनद्वारे ‘माणुसकीची भिंत’चे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2017 00:49 IST

मानवाने मानवाच्या गरजा पूर्ण करण्याकरिता मदतीचा हात समोर करून एकमेकांना सहकार्य करायचे असते. तोच खरा माणुसकीचा धर्म समजला जातो.

गडचांदूर : मानवाने मानवाच्या गरजा पूर्ण करण्याकरिता मदतीचा हात समोर करून एकमेकांना सहकार्य करायचे असते. तोच खरा माणुसकीचा धर्म समजला जातो. गरजु लोकांना वेळेवर त्यांना लागणार साहित्य प्राप्त व्हावे, याकरिता अल्ट्राटेक फाउंडेशनच्या वतीने माणुसकीची भिंत उभारण्यात आली.या उपक्रमाचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरटकर यांनी केले तर प्रमुख पाहुणे म्हणून ठाणेदार विनोद रोकडे अध्यक्षस्थानी अल्ट्राटेक कंपनीचे युनिट हेड जी. बालसुब्रम्हण्यम उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून फंक्शन हेड अलोक निगम, एस.के. तिवारी, अनिल पिलई, गजेंद्र सिंग, आनंद लोहीया, जि.प. सदस्य शिवचंद्र काळे, कामगार संघाचे साईनाथ बुच्चे, उपसरपंच पुरुषोत्तम आस्वले, सुनिल देसाई, राजेंद्र मेहता, रमेशकुमार देवांगन, अनिल शर्मा, सुधीर गुप्ता, नरेश कौशिक, डॉ. अनिल रायपलीवार, चंद्रशेखर पला, भावेशवाला, रत्नाकर चटप, प्रमोद वाघाडे, रवी बंडीवार व गावातील असंख्य नागरिक उपस्थित होते.समाजात जीवन जगत असताना अनेक निरागस चेहऱ्यांना आपण पाहतो. ज्यांच्या जीवनातला आनंद हरपल्याचे त्यांना वाटत असते. त्या मानवांना त्यांच्या जीवनात हास्य निर्माण करण्याकरिता आम्हा सर्वांना मदतीचा हात द्यायचा आहे. याकरिता नको असेल ते आणून द्या, हवे असेल ते घेऊन जा, हा नारा देऊन माणुसकीच्या भिंतीचे उद्घाटन करण्यात आले आहे. आपल्या घरातील नको असलेली वस्तु इतरांच्या कामात येऊ शकते. अशा वस्तु या ठिकाणी पोहचवायच्या आहेत व गरजु लोकांनी त्या घेऊन जायच्या आहेत. या उपक्रमाला सर्वांनी सहकार्य करून या उपक्रमाद्वारे माणुसकीचे नाते जपायला मदत करावी, असे प्रतिपादन अल्ट्राटेकचे युनिट हेड जी. बालसुब्रमण्यम यांनी केले. उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरटकर, ठाणेदार विनोद रोकडे, अल्ट्राटेक कंपनीचे सर्व अधिकारी यांनी नको असलेल्या वस्तु इथे ठेवून या उपक्रमाची सुरूवात केली. (वार्ताहर)