शहरं
Join us  
Trending Stories
1
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
2
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
3
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
4
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
5
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
6
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
7
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
8
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
9
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
10
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
11
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
12
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
13
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
14
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
15
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
16
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
17
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
18
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
19
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
20
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर

By admin | Updated: December 11, 2014 23:03 IST

इरई व झरपट नदीच्या पूरबुडित क्षेत्रातील बाराशे घरमालकांना मनपाने नोटीस बजावून घरे स्वत:च पाडावे, अन्यथा बुलडोजर चालविला जाईल, असा इशारा दिला आहे. असे असले तरी यातील

नगरपालिकेने दिली परवानगी
चंद्रपूर : इरई व झरपट नदीच्या पूरबुडित क्षेत्रातील बाराशे घरमालकांना मनपाने नोटीस बजावून घरे स्वत:च पाडावे, अन्यथा बुलडोजर चालविला जाईल, असा इशारा दिला आहे. असे असले तरी यातील बहुतांश रहिवाशांना तत्कालीन नगरपालिकेनेच बांधकामाची परवानगी दिल्याची माहिती आहे. त्यामुळे येथील रहिवाशी घरे सोडायला तयार असल्याचे दिसत नाही. अशा परिस्थितीत या रेड व ब्ल्यू लाईन क्षेत्रातील रहिवाशी भाग खाली करण्यासाठी तेथील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.
चंद्रपूर शहरातून इरई व झरपट या नद्या वाहतात. फार पूर्वी या नद्या रहिवाशी क्षेत्राच्या दूर होत्या. मात्र सुमारे ३० ते ४० वर्षापूर्वीपासून या क्षेत्रात नागरिकांनी कच्ची घरे बांधली. याचवेळी नगरपालिकेने त्यांचे अतिक्रमण हटविणे अपेक्षित होते. मात्र नगरपालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले. यातील काही लोकांनी त्यावेळी खुद्द नगरपालिकेलाच घरे बांधकामाची परवानगी मागितली होती. त्यावेळी हे क्षेत्र पुरबुडित क्षेत्र आहे, हे माहित असतानाही नगरपालिकेने अनेकजणांना या क्षेत्रात बांधकामाची परवानगी दिली.
आता महानगरपालिकेला अचानक पण उशिरा जाग आली. मनपाने इरई व झरपट नदीच्या पूरपुडित क्षेत्रातील अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेच्या प्रथम सत्रात मनपाने सिस्टर कॉलनी, जगन्नाथबाबा नगर, हवेली गार्डन परिसर, रहमतनगर येथील एक हजार २०० घरमालकांना नोटीस बजावली आहे. त्यानंतर झरपट नदीच्या पूरबुडित क्षेत्रातील शेकडो रहिवाशांनाही मनपाने नोटीस बजावली आहे. (शहर प्रतिनिधी)