शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांना विश्वासात न घेणे ही मनमानीच !

By admin | Updated: June 7, 2015 01:13 IST

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू केली यासाठी आपला विरोध नाही. मात्र जिल्ह्यातील कुण्याही आमदरांना विश्वासात न घेता आणि दारूबंदी समितीच्या अहवालावर ....

धानोरकरांनी दर्शविला विरोध : दारूबंदी मुद्यावरून वित्तमंत्र्यांना घरचा अहेरचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू केली यासाठी आपला विरोध नाही. मात्र जिल्ह्यातील कुण्याही आमदरांना विश्वासात न घेता आणि दारूबंदी समितीच्या अहवालावर विधानसभेत जराही चर्चा न करता वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा निर्णय घेतला. आमदरानना विशफ्वासात न घेऊन जाहीर केलेला हा निर्णय म्हणजे मनमानीच आहे, अशी टीका शिवसेना आमदार बाळू धानोरकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेतून केली.जिल्ह्यातील दारूबंदी निर्णयाच्या विरोधात शिवसेना आमदार धानोरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस आणि महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना पत्र लिहिले असून, दारूबंदीचा निर्णय योग्यपणे न झाल्याला वित्तमंत्र्यांना जबाबदार ठरविले आहे. ते म्हणाले, राज्य सरकारने वित्तमंत्र्यांच्या दबावाखाली हा निर्णय घेतला आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला. मात्र जिल्ह्यातील कुण्याही आमदाराला यात विश्वासात घेण्याची गरज त्यांना वाटली नाही.दारूबंदीच्या निर्णयासाठी गठीत करण्यात आलेल्या देवतळे समितीकडून दारूबंदीची तीन टप्प्यात शिफारस केली होती. विधानसभेत या अहवालावर चर्चा होऊन निर्णय होणे अपेक्षित होते. मात्र अहवालावर कसलीही चर्चा न करता राज्य सरकारने निर्णय जाहीर करून मनमानी चालविली आहे.आमदार बाळू धानोरकर म्हणाले, दारूबंदीला आपला विरोध नाही. दारूची सर्वाधिक समस्या ग्रामीण भागात होती. त्यामुळे, गाव-तालुका आणि जिल्हा अशी टप्प्याने दारूबंदी करणे गरजेचे होते.यामुळे पोलिसांवरही ताण पडला नसता. दारूबंदीच्या अंमलबजावणीतील अडचणीही यातून दूर करता आल्या असत्या.दारूबंदीच्या यशस्वीतेमध्ये अडचणी दिसत असल्याने या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली असल्याचे सांगून ते म्हणाले, बळजबरीने दारूबंदी शक्य नाही. दारूबंदी आणि व्यसनमुक्तीसाठी सुनियोजितपणे अंमलबजावणी व्हायला हवी होती. यातील कमतरतेमुळे शेकडो युवक अवैध दारू व्यवसायात जुळले असून यातून नवे माफिया जन्मास येण्याची भीती बळावल्याचे ते यावेळी म्हणाले. (जिल्हा प्रतिनिधी)