शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

मांगली येथील अंगणवाडी सेविका भरती रद्द

By admin | Updated: March 20, 2017 00:30 IST

बनावट कागदपत्रांच्या आधारे मांगली येथे करण्यात आलेली अंगणवाडी सेविकेची नियुक्ती अखेर रद्द करण्यात आली आहे.

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश : बनावट कागदपत्रांद्वारे नोकरी प्रकरणनागभीड : बनावट कागदपत्रांच्या आधारे मांगली येथे करण्यात आलेली अंगणवाडी सेविकेची नियुक्ती अखेर रद्द करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशान्वये ही नियुक्ती रद्द करण्यात आली. या प्रकरणी तत्कालीन चौकशी अधिकारी व मूल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस.जी. पुरी यांनी वस्तुनिष्ठ अहवाल सादर न केल्याचे ताशेरेही ओढण्यात आले आहेत.मांगली येथील अंगणवाडी सेविकेच्या पदासाठी इच्छुक असलेल्या पात्र-अपात्र उमेदवारांची यादी १४ जानेवारी २०१६ रोजी प्रकाशित करण्यात आली. या यादीत विना प्रशांत पालपणकर यांना अपात्र म्हणून घोषित करण्यात आले होते. तरीही पालवणकर यांना नियुक्ती आदेश देण्यात आले. या नियुक्तीवर प्रिती संजय माकोडे यांनी आक्षेप घेतला. पण कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. यानंतर प्रिती माकोडे व शालू चौधरी यांनी ६ फेब्रुवारी रोजी पुन्हा तक्रार केली.या तक्रारीनंतर मूल पं.स. चे तत्कालीन गटविकास अधिकारी एस.जी. पुरी यांची चौकशी समिती नेमण्यात आली. पण त्यांनी थातूरमातूर चौकशी करून आपला अहवाल नागभीडच्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना सादर केला. दरम्यान प्रिती माकोडे यांनी आपल्या वकीलामार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पुन्हा तक्रार केली. या तक्रारीवर १८ आॅक्टोबर २०१६ रोजी सुनावणी झाली. सुनावणी दरम्यान उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता, या भरती प्रक्रियेत शासन निर्णय निकषाचे पालन झाले नाही व एस.जी. पुरी यांनी वस्तुनिष्ठ अहवाल सादर केला नसल्याचे निष्पन्न झाले. यानंतर ३ फेब्रुवारी २०१७ ला आणखी अपिलार्थी व गैरअपिलार्थी यांचे यांचे म्हणणे ऐकून घेत भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)विना पालपणकर यांनी शासनाची फसवणूक केली आहे. पालपणकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा व उचललेले मानधन परत घेण्यात यावे. त्याचबरोबर चौकशी अधिकारी एस.जी. पुरी यांच्यावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी मी पाठपुरावा करणार आहे.- रवी देशमुख, सभापती, पं.स. नागभीड.अंगणवाडी सेविका पदाची भरती प्रक्रिया नव्याने न राबविता जुन्याच अर्जदारांमधून अंगणवाडी सेविकेची निवड करावी. यातून वेळेचा अपव्यय टाळावा.- प्रिती संजय माकोडे, अपिलाथी.