आयुष्याची खरी जडणघडण संस्कारातूनच - चैतन्य महाराज

By Admin | Updated: December 18, 2015 01:24 IST2015-12-18T01:24:05+5:302015-12-18T01:24:05+5:30

माणसाच्या आयुष्याची खरी जडणघडण संस्कारातूनच होत असते. धर्माने सांगितलेल्या संस्कारांचे महत्व ओळखा आणि आयुष्य निरामय करा, ...

The real realization of life is in the form of charity - Chaitanya Maharaj | आयुष्याची खरी जडणघडण संस्कारातूनच - चैतन्य महाराज

आयुष्याची खरी जडणघडण संस्कारातूनच - चैतन्य महाराज

जगन्नाथबाबांचा वार्षिक जन्मोत्सव : हजारो भाविकांची उपस्थिती
नंदोरी : माणसाच्या आयुष्याची खरी जडणघडण संस्कारातूनच होत असते. धर्माने सांगितलेल्या संस्कारांचे महत्व ओळखा आणि आयुष्य निरामय करा, असे आवाहन वढा येथील युवा योगी चैतन्य महाराज यांनी केले.
स्थानिक जगन्नाथबाबा देवस्थान कमेटीच्या वतीने आयोजित श्री जगन्नाथबाबा यांचा वार्षिक जन्मोत्सव बुधवारी १६ डिसेंबरला नंदोरीतील देवस्थानात पार पडला. यावेळी झालेल्या स्वानुभव प्रवचनात ते बोलत होते. १४ डिसेंबरपासून या त्रिदिवसीय महोत्सवाला प्रारंभ झाला. त्याची सांगता महाप्रसाद आणि घुगरी काल्याने बुधवारी झाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. धनराज आस्वले, लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी गोपालकृष्ण मांडवकर, सरपंच अनुराधा पिंपळकर प्रामुख्याने उपस्थित होते. देवस्थान कमेटीच्या वतीने पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान नागपूर येथील रंजना संजय केवटे यांनी मंदीराला ५१ हजार रूपयांची देणगी दिल्याबद्दल त्यांचा सत्कर करण्यात आला. ह.भ.प. पांडूरंग लांबट महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर दहीडांडी फोडण्यात आली. तत्पूर्वी नंदोरी, डोंंगरगाव (खडी), वरोरा, मांगरूळ, पंढरपूर येथून आलेल्या पालख्यांचा आणि विविध ठिकाणांहून आलेल्या भजन दिंड्यांचा सन्मान करण्यात आला. सुमारे सहा हजारांवर भाविक या महोत्सवात सहभागी झाले होते. त्यामुळे परिसराला यात्रेचे रूप आले होते. (वार्ताहर)

Web Title: The real realization of life is in the form of charity - Chaitanya Maharaj