शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

राखी कंचर्लावार नव्या महापौर

By admin | Updated: October 30, 2014 22:48 IST

महापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसमधील महापौर गटाच्या मात्र आता भाजपावासी झालेल्या राखी कंचर्लावार यांनी बाजी मारली. काँगे्रसच्या उमेदवार सुनिता लोढीया यांचा ३९ विरूद्ध

काँग्रेसच्या हाताने चढला भाजपाचा झेंडा : मनपात नव्या राजकीय समीकरणाचे संकेतचंद्रपूर : महापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसमधील महापौर गटाच्या मात्र आता भाजपावासी झालेल्या राखी कंचर्लावार यांनी बाजी मारली. काँगे्रसच्या उमेदवार सुनिता लोढीया यांचा ३९ विरूद्ध २७ मतांनी पराभव करून १२ मतांनी त्या विजयी झाल्या. तर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजपाचे वसंत देशमुख विजयी झाले.६६ सदस्यसंख्या असलेल्या मनपाच्या सभागृहातील पक्षीय बलाबल लक्षात घेता काँगे्रसला विजयाची संधी होती. मात्र अंतर्गत गटबाजीने घात केला. दोन दिवसांपूर्वी पक्षाने निवडणूक निरीक्षक पाठवूनही पक्षातील बंडाळी शमविता आली नाही. ही स्थिती कायम राहिल्याने महापौरपदाची निवडणूक काँग्रेस विरूद्ध काँग्रेस अशीच झाली. ऐन वेळी भाजपाने पुढाकार घेत खेळी केली. कंचर्लावार यांनी भाजपात प्रवेश घेतल्याचे सांगितले गेले असले तरी प्रत्यक्षात त्यांनी नामांकन मात्र काँग्रेसच्या नगरसेविका म्हणूनच दाखल केले. यावर काँग्रेसचे नवनियुक्त गटनेते प्रशांत दानव यांनी मतदानापूर्वी सभागृहात आक्षेप घेतला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस लोकशाही आघाडीच्या अधिकृत उमेदवार सुनिता लोढीया या असल्याने राखी कंचर्लावार यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. त्यावर पिठासीन अधिकारी असलेले जिल्हाधिकारी दीपक म्हैसेकर यांनी, न्यायालयीन निर्णयाच्या अधिन राहून ही निवडणूक घेत असल्याचे सांगून मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली.दरम्यान, या निवडणुकीसाठी काँग्रेसने व्हिप जारी केला होता. त्याच्या प्रति सभागृहात काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांना देण्यात आल्या. मात्र या व्हिपला न जुमानता काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी कंचर्लावार यांना मतदान केले. त्यामुळे या नगरसेवकांवर पक्ष काय कारवाई करणार, हे महत्वाचे आहे. निवडणुकीच्या निकालानंतर शहरातून नवनिर्वाचित महापौर व उपमहापौरांची विजयी रॅली काढण्यात आली. भाजपाचे झेंडे झळकवित निघालेल्या या रॅलीमध्ये काँग्रेसमधील अनेक राजकीय चेहरेही उपस्थित होते. या निवडणुकीने शहरात नव्या राजकीय समिकरणाचे संकेत दिले आहेत. मतदानाच्या आदल्या दिवशी राखी कंचर्लावार यांनी भाजपात प्रवेश केला असला तरी, भाजपात प्रवेश करण्याच्या तयारीत असलेल्या १३ जणांच्या नावाची यादी तयार असल्याची चर्चा आज निवडणुकीनंतर जोरात सुरू होती. काँग्रेसच्या नगरसेवकांसह मनपातील नेत्यांचा समावेश या यादीत असल्याचीही जोरात चर्चा आहे. (जिल्हा प्रतिनिधी)