शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
2
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
3
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
4
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
5
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
6
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
8
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
9
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
10
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
11
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
12
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
13
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
14
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
15
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
16
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
17
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
18
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
19
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
20
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

राजोली मामा तलावाखालील धान पिके धोक्यात

By admin | Updated: October 12, 2014 23:43 IST

राजोली मामा तलावाखालील धान पिके पाण्याअभावी धोक्यात आली आहेत. सिंचन विभागाच्या हलगर्जी कारभारामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसण्याची भीती वर्तविली जात आहे.

राजोली : राजोली मामा तलावाखालील धान पिके पाण्याअभावी धोक्यात आली आहेत. सिंचन विभागाच्या हलगर्जी कारभारामुळे शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसण्याची भीती वर्तविली जात आहे.यावर्षीच्या अत्यल्प पावसामुळे या तलावात जेमतेम पाणी जमा झाले. या पाण्याचे योग्य नियोजन झाले असते तर त्याचा सर्व शेतकऱ्यांना लाभ झाला असता. तेवढा जलसाठाही उपलब्ध होता. परंतु सिंचन विभागाने याकडे दुर्लक्ष करुन ही बाब गांभिर्याने घेतली नाही. नियोजनाअभावी आता तलावात अत्यल्प जलसाठा उरला आहे. वरुनराजाने कृपा केली तरच पिके वाचू शकतील. अन्यथा तलावाखाली असणारे सर्वच धान करपून जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या सात ते आठ दिवसांपासून या तलावाच्या नुतनीकरणाची कामे सुरू आहेत. केवळ सांडव्याचे काम वगळता उर्वरित कामे अर्धवट करुन कंत्राटदाराने उन्हाळ्यातच काम बंद केले. या अर्धवट कामामुळे नहरातील पाणी वितरणात अडसर निर्माण होत आहे. नहराला सिमेंट अस्तरीकरण करताना तांत्रिक बाब तपासून न पाहता काम केल्यामुळे मुख्य गेट जवळच सुमारे दोन फुट पाणी अडून पडले आहे. वितरिकेची कामे तज्ज्ञ कामगारांकडून करवून घेण्यात न आल्याने त्यातून पाणी बाहेर पडतच नाही. काही ठिकाणी नहरात पाणी अडवून पाटचारीत पाणी टाकावे लागत आहे. या सर्व प्रकारामुळे पाण्याच फार मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असून सिंचन विभागाने या विषयात हात वर केले आहे. एवढ्यात जर वरुणराजाने कृपा झाली. जोरदार पावसाचे आगमन झाले तरच येथील धान पिके तग धरणार आहेत. अन्यथा हातचे पीक हिरावून घेतल्याचे दु:ख कास्तकाराना सोसावे लागणार आहे. (वार्ताहर)