जिल्ह्यात सर्वत्र पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 05:01 IST2020-07-06T05:00:00+5:302020-07-06T05:01:23+5:30

चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने आगमन केल्यानंतर दडी मारली होती. मात्र गुरुवारी सायंकाळी जिल्ह्यात अनेक भागात दमदार पाऊस बरसला. त्यानंतर शनिवारीदेखील जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली. रविवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दरम्यान, सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास चंद्रपूरसह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पावसाने हजेरी लावली. ढगाळ वातावरण दिवसभर कायम राहिले.

Rain everywhere in the district | जिल्ह्यात सर्वत्र पाऊस

जिल्ह्यात सर्वत्र पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूरसह जिल्ह्यातील जवळजवळ सर्वच भागात शनिवारी व रविवारी बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावली. आतापर्यंत पेरणी करून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे आनंद झाला असून उकाडाही काही प्रमाणात कमी झाला आहे. जिल्ह्यात रविवारी एकूण ५८४.३६ मिमी पाऊस झाला.
चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने आगमन केल्यानंतर दडी मारली होती. मात्र गुरुवारी सायंकाळी जिल्ह्यात अनेक भागात दमदार पाऊस बरसला. त्यानंतर शनिवारीदेखील जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली. रविवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दरम्यान, सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास चंद्रपूरसह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पावसाने हजेरी लावली. ढगाळ वातावरण दिवसभर कायम राहिले. मात्र पाऊस अधेमधे रिपरिप स्वरुपात पडत राहिला. दरम्यान, बल्लारपूर तालुक्यातील बामनी ग्रामपंचायत हद्दीतील वार्ड क्रमांक २ मधे पावसाचे पाणी घरात शिरले.

Web Title: Rain everywhere in the district

टॅग्स :Rainपाऊस