पावसाने आणले डोळ्यात पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 06:00 IST2019-11-07T06:00:00+5:302019-11-07T06:00:28+5:30

ब्रह्मपुरी तालुक्यात २८ हजार ०५८ हेक्टर क्षेत्र पिकाखाली आहे. त्यापैकी २७ हजार ८२४ हेक्टर क्षेत्रात भातपीक घेण्यात आले आहे. त्यापैकी ३३ टक्क््यांच्या आतील नुकसानीस पात्र असलेले २११० हेक्टर क्षेत्र पंचनामा केल्यानंतर बांधित ठरले आहे.

Rain brought water to the eyes | पावसाने आणले डोळ्यात पाणी

पावसाने आणले डोळ्यात पाणी

ठळक मुद्देजिल्ह्यातील शेतकऱ्यांची दाणादाण : पहाडावरील शेतकऱ्यांची अवस्था दयनीय

कर्जाच्या डोंगरामध्ये यावर्षी पडणार मोठी भर
रवी रणदिवे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रह्मपुरी : अवकाळी पावसाने तालुक्यातील शेतकºयांचे मोठे नुकसान झाले असून आता जगायचे कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दिवसेंदिवस कर्जाचा डोंगर वाढत असून यावर्षीच्या पावसामुळे पुन्हा त्यात भर पडली आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यात २८ हजार ०५८ हेक्टर क्षेत्र पिकाखाली आहे. त्यापैकी २७ हजार ८२४ हेक्टर क्षेत्रात भातपीक घेण्यात आले आहे. त्यापैकी ३३ टक्क््यांच्या आतील नुकसानीस पात्र असलेले २११० हेक्टर क्षेत्र पंचनामा केल्यानंतर बांधित ठरले आहे. तर ३३ टक्क््यांच्या वर नुकसान झालेले क्षेत्र २३२८ हेक्टर असल्याने ३३ टक्के नुकसान क्षेत्रामध्ये जवळजवळ ४४३८ हेक्टर शेतजमीनीवरील भात पीक नुकसानग्रस्त झाले आहेत. यापैकी ३५८६ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहे. यामध्ये ४०५८ शेतकरी बाधित असल्याचे प्राथमिक अंदाज प्रशासनाने लावला आहे. उर्वरित ८५२ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे येत्या काही दिवसात पूर्ण होणार आहे. मात्र किमान शासनाने आर्थिक मदत करावी, अशी आर्त हाक शेतकऱ्यांची आहे. तालुक्यात कापूस, सोयाबिन व इतर पिके २३४ हेक्टर क्षेत्रात आहे. मात्र या पिकाचेही मोठे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे असून कर्जाच्या डोगरावर आणखी भर पडली आहे.

Web Title: Rain brought water to the eyes

टॅग्स :agricultureशेती