शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

दुकानांसमोर पुन्हा दुचाकीच्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 05:00 IST

जिल्ह्यात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन लागू आहे. सर्व दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ५ यावेळेत उघडी ठेवण्यास परवानगी आहे. मात्र दुकानामध्ये दुपारी १२ वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. दुकानदारांनी दुकानामध्ये एकावेळी पाच पेक्षा जास्त ग्राहकांना दुकानात घेवू नये, फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे, सॅनिटायझेशन या अटी असताना नियमांचे उल्लंघन केले जात आहे.

ठळक मुद्देवाहतूककोंडी : खरेदीसाठी येणाऱ्यांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला. दरम्यान, मागील आठवड्यापासून जिल्हा प्रशासनाने यात शिथिलता दिली आहे. तेव्हापासून दुकाने गजबजली असून दुकानांसमोर दुचाकींच्या रांगा लागल्याचे चित्र बघायला मिळत आहे. परिणामी वाहतुकीची कोंडी तसेच येणाऱ्या ग्राहकांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे.जिल्ह्यात ३१ मेपर्यंत लॉकडाऊन लागू आहे. सर्व दुकाने सकाळी ७ ते सायंकाळी ५ यावेळेत उघडी ठेवण्यास परवानगी आहे. मात्र दुकानामध्ये दुपारी १२ वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. दुकानदारांनी दुकानामध्ये एकावेळी पाच पेक्षा जास्त ग्राहकांना दुकानात घेवू नये, फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे, सॅनिटायझेशन या अटी असताना नियमांचे उल्लंघन केले जात आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात सायंकाळी ७ ते सकाळी ७ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण संचारबंदी लागू आहे. परंतु रात्री १० वाजेपर्यंत अनेक नागरिक रस्त्याने फिरताना दिसून येतात. त्याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. शहरातील दुकानांसमोर ग्राहकांना उभे राहण्यासाठी ठराविक अंतरावर जागा आखणे आवश्यक आहे. मात्र त्याच ठिकाणी ग्राहकांची वाहने बघायला मिळत आहे.उल्लंघन केल्यास होणार कारवाईवैद्यकीय कारणाशिवाय किंवा मार्गदर्शक तत्वानुसार परवानगी असलेल्या व्यक्ती वगळून इतर व्यक्तींना आंतर जिल्हा व आंतर राज्य संचार करण्यास बंदी आहे. अधिकृत परवानगी शिवाय परराज्यातून जिल्ह्यात व जिल्ह्यातून परराज्यातून प्रवासाच्या वाहतुकीस पूर्णपणे बंदी आहे. सर्व शैक्षणिक व प्रशिक्षण संस्था, शिकवणी वर्ग बंद, सर्व सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल, जिम, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर, बार व तत्सम, व्यायामशाळा व सामुहिक खेळांसाठी क्रीडा कॉम्पलेक्स बंद ठेवण्याचे आदेश आहेत. सर्व सामाजिक, राजकीय, खेळ, करमणूक, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्ये व इतर मेळाव्यांना बंदी आहे. सर्व धार्मिक स्थळे अथवा पूजेची ठिकाणे भाविकांसाठी बंद आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबधितांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियमानुसार कारवाई होऊ शकते.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीcorona virusकोरोना वायरस बातम्या