पडोली ते राजुरा चौपदरीकरणात चुनखडीचा वापर, मजबुतीवर प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 05:00 AM2020-01-21T05:00:00+5:302020-01-21T05:00:18+5:30

चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चारपदरी रस्त्यांचे बांधकाम सुरू आहे. या रस्ता बांधकामात कुठेही चुनखडीचा वापर होत नसल्याचे बघायला मिळत आहे. याचे उदाहरण द्यायचे झाल्यास चंद्रपूर ते मूल मार्गावर रामनगर पोलीस ठाण्यापासून बांधकाम सुरू असलेल्या मार्गावर काळ्या गिट्टीचा वापर होत आहे.

The question of the use of limestone in strengthening of Padoli to Rajura quadrangle is questionable | पडोली ते राजुरा चौपदरीकरणात चुनखडीचा वापर, मजबुतीवर प्रश्न

पडोली ते राजुरा चौपदरीकरणात चुनखडीचा वापर, मजबुतीवर प्रश्न

googlenewsNext
ठळक मुद्देसार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष : निकृष्ट दर्जाचा रस्ता अल्पावधितच खराब होणार

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पडोली ते राजुरा या बायपास मार्गाच्या चौपदरीकरणाचे बांधकाम गतीने सुरू आहे. ही विकासाच्या दृष्टीने चांगली बाब असली तरी या मार्गाच्या बांधकामात कंत्राटदार कंपनी मात्र चुनखडीचा सर्रासपणे वापर करीत आहे. परिणामी २५० कोटी रुपये खर्चून बांधकाम सुरू असलेला हा रस्ता फार काळ टिकणार नसल्याची भीती जाणकार व्यक्त करीत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चारपदरी रस्त्यांचे बांधकाम सुरू आहे. या रस्ता बांधकामात कुठेही चुनखडीचा वापर होत नसल्याचे बघायला मिळत आहे. याचे उदाहरण द्यायचे झाल्यास चंद्रपूर ते मूल मार्गावर रामनगर पोलीस ठाण्यापासून बांधकाम सुरू असलेल्या मार्गावर काळ्या गिट्टीचा वापर होत आहे. या गिट्टीमुळे रस्ता मजबूत होईल, शिवाय दीर्घकाळ टिकणार. रस्त्यावर चुनखडीचा वापर केल्यास ही गिट्टी फार काळ टिकणार नाही. रस्ता तयार झाल्यानंतर त्यावरून वाहनांची वर्दळ सुरू झाल्यानंतर ही चुनखडी फुटून अल्पावधितच रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य तयार होईल. यामुळे पुन्हा या मार्गाने वाहनधारकांना खस्ता खाव्या लागेल, असेही बोलले जात आहे.
पडोली-दाताळा-हडस्ती ते राजुरा अशा या बायपास रस्त्यासाठी राज्य शासनाने २५० कोटींचे टेंडर काढले होते. हे टेंडर बाहेर राज्यातील एम.बी. पाटील कंस्ट्रक्शन कंपनीला दिले आहे. या कंपनीकडून राजुरा-पौनी-कवठाळा-नारंडा-वनोजा ते कोरपना या मार्गाचेही काम सुरू आहे.
या मार्गावरही सुरुवातीला या कंपनीने मेजर मिनरलचा सर्रास वापर सुरू केला होता. याकडे ‘लोकमत’ लक्ष वेधल्यानंतर कंस्ट्रक्शन कंपनीचे धाबे दणादले होते. लगेच मेजर मिनरचा वापर बंद केला होता. मात्र पडोली ते राजुरा या मार्गाच्या बांधकामात काही ठिकाणी काळी गिट्टी तर काही ठिकाणी चुनखळी गिट्टीचा वापर सुरू केल्यामुळे कंपनीच्या उद्दीष्टाबाबत संशय बळावला आहे. असे करण्यास कंपनी धजावत असल्यामुळे यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे पाठबळ असल्याचेही बोलले जात आहे.

अन्य कंत्राटदारांमध्ये कुजबुज
आजवर जिल्ह्यात झालेल्या रस्ता बांधकामात कुठेही चुनखडीचा वापर अन्य कंस्ट्रक्शन कंपनीला सार्वजनिक बांधकाम विभागाने करू दिलेला नाही. चुनखडीमुळे हा रस्ता फारकाळ टिकत नाही, असे असताना पडोली - राजुरा मार्गावर मात्र चुनखडीचा वापर होत असतानाही बांधकाम विभाग शांत कसा, असा सवाल काही कंत्राटदारांकडून उपस्थित केला जात आहे.

रस्ता बांधकामाची चौकशी व्हावी
पडोली ते राजुरा रस्ता बांधकामासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. या निधीचा विनियोग व्हावा. मागील अनेक वर्षांची या रस्त्याची खस्ताहालत कायमची दूर होईल. चंद्रपूर ते राजुरासाठी कमी लांबीचा हा रस्ता जडवाहनांंसाठी महत्त्वाचा असेल. या रस्त्यावर भविष्यात मोठ्या प्रमाणावर वर्दळ असणार आहे. या महत्त्वपूर्ण रस्त्याचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे होत असेल तर तो अल्पावधित खराब होण्याची शक्यता जाणकार मंडळींकडून व्यक्त केली जात आहे.

Web Title: The question of the use of limestone in strengthening of Padoli to Rajura quadrangle is questionable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.