भोजनावळीतून सोडविला रुग्णांच्या नातेवाईकांच्या जेवणाचा प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:47 IST2021-05-05T04:47:13+5:302021-05-05T04:47:13+5:30

चंद्रपूर : कोरोना रुग्ण सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे उपचारासाठी रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहे. मात्र काळजी घेण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांचे ...

The question of the meal of the relatives of the patients solved from the meal | भोजनावळीतून सोडविला रुग्णांच्या नातेवाईकांच्या जेवणाचा प्रश्न

भोजनावळीतून सोडविला रुग्णांच्या नातेवाईकांच्या जेवणाचा प्रश्न

चंद्रपूर : कोरोना रुग्ण सातत्याने वाढत आहेत. त्यामुळे उपचारासाठी रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहे. मात्र काळजी घेण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांचे लाॅकडाऊन असल्यामुळे प्रचंड हाल होत आहेत. हे लक्षात घेत शहरातील सामाजिक कार्य करण्यासाठी सातत्याने धडपणाऱ्या काही युवकांनी

एकत्र येत रुग्णांच्या नातेवाईकांना जेवणाचे डबे देण्याचा उपक्रम सुरू केला. यासाठी एक-एक करीत अनेकांनी मदतीचा हात दिला असून यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना दिलासा मिळला आहे.

कोरोना रुग्णसंख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाॅकडाऊन करण्यात आले आहे. परिणामी खानावळ, रेस्टारंट बंद आहेत. जे सुरू आहे त्यासाठी वेळ निश्चित आहे. अशा स्थितीत रुग्णांची काळजी घेण्यासाठी येणाऱ्या नातेवाईकांचे मोठे हाल होत आहेत. विशेष म्हणजे, चंद्रपूर येथे जिल्हाभरासह शेजारी असलेल्या यवतमाळ, गडचिरोली तसेच तेलंगणातूनही मोठ्या प्रमाणात रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे प्रत्येकांनाच अडचणीचा सामना करावा लागत आहे. जेवणाचा प्रश्न लक्षात घेता येथील सामाजिक कार्यकर्तेे प्रशांत आर्वे, प्रा. विजय बदखल, डाॅ. चेतन खुटेमाटे, तहसीलदार संतोष खांडरे यांनी रुग्णांच्या नातेवाईकांना जेवणाचे डबे पुरविण्याचा संकल्प केला. यासाठी त्यांनी त्वरित अंलबजावणी सुरू केली. बघता बघता यासाठी अनेकांनी मदतीचा हात समोर केला असून मागील काही दिवसांपासून दररोज शासकीय कोविड सेंटरमध्ये जेवणाचे डबे दिले जात आहेत. या उपक्रमामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना दिलासा मिळाला असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

कोट

रुग्णालयात रुग्ण दाखल झाल्यानंतर रुग्णालय प्रशासन रुग्णाची काळजी घेत आहे. मात्र त्यांच्यासोबत आलेल्या नातेवाईकांचे प्रचंड हाल होत आहेत. लाॅकडाऊन असल्यामुळे खानावळ, रेस्टारंट बंद आहेत. अशावेळी जेवणाचा प्रश्न त्यांच्यासमोर होता. त्यामुळे आम्ही एकत्र येऊन रुग्णांच्या नातेवाईकांना जेवणाचे डबे पुरविण्याचा उपक्रम सुरू केला. सामाजिक भान ठेवून जे जे करता येईल, ते करण्याचा प्रयत्न या माध्यमातून सुरू आहे.

-प्रा. विजय बदखल

सामाजिक कार्यकर्ते, चंद्रपूर

Web Title: The question of the meal of the relatives of the patients solved from the meal