शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

वैयक्तिक टीकेमुळे प्रचाराची पातळी घसरतेयं

By admin | Updated: October 8, 2014 23:24 IST

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहचली असून १५ दिवसांपूर्वी गुण्यागोविंदाने राहत असलेले सर्वच पक्ष सत्तेच्या हव्यासापोटी एकमेकांची उणी-दुणी काढत आहेत. एकमेकांवर चिखल फेकण्याचे

ब्रह्मपुरी : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहचली असून १५ दिवसांपूर्वी गुण्यागोविंदाने राहत असलेले सर्वच पक्ष सत्तेच्या हव्यासापोटी एकमेकांची उणी-दुणी काढत आहेत. एकमेकांवर चिखल फेकण्याचे लोन सर्वच ठिकाणी दिसत असून साम, दाम, दंड आता प्रचारात सुरू झाला आहे.वैयक्तिक टिकाटिपणीमुळे कोणताही पक्ष भविष्यातील मतदारसंघाच्या ‘व्हिजन’बद्दल बोलताना दिसत नाही. नेत्यांच्या वैयक्तिक टीकेमुळे कधी नव्हे ती प्रचाराची पातळी घसरलेली आहे. परिणामी भविष्यातील विधानसभा क्षेत्रातील सुजाण नागरिकात धास्ती निर्माण झाली आहे. नेत्यांच्या वैयक्तिक दोषांमुळे राजकीय पक्षांचे उमेदवार, ‘कोठे घेऊन जाणार मतदारसंघ माझा’, अशीच स्थिती सर्वसामान्य मतदारात निर्माण झाली आहे.विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर युती व आघाडी एकत्ररीत्या निवडणुकीला समोर जाणार असा सर्वच राजकीय विश्लेषकांचा अंदाज होता. मात्र मुख्यमंत्र्यांच्या पदाच्या लालसेने युती व आघाडी संपुष्टात आणून, सर्वच पक्षांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. यामुळे गेल्या अनेक वर्षापासून गळ्यात गळे घालणारे नेते परस्पराविरोधी उभे ठाकले आहेत. काहीही करुन आमदारकी हस्तगत करायची, या महत्त्वाकांक्षेने पछाडलेले सर्वच राजकीय पक्षांचे राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांपासून ते गल्लीगोबाळ्यातील नेतेही वैयक्तिक पातळीवर टीकाटिप्पणी करीत आहेत. बोलण्याची ढब, पेहराव, केशरचना याबाबत कुत्सीतपणे टर उडवली जात आहे. त्यांच्या टिपणींमुळे कार्यकर्त्याचे मनोरंजन होत असले तरी विकासाचे कोणतेच व्हीजन दिसत नाही.विधानसभा क्षेत्रातील मूळ समस्यांवर व मतदारांच्या हिताच्या बाबतीत समस्येला बगल दिली जात आहे. ब्रह्मपुरी-सावली, सिंदेवाही तालुक्यात विविध प्रश्न मार्गी लागल्यास येथील शेतकरी वर्ग सुजलाम सुफलाम होऊ शकतो. तालुक्यातील महत्त्वपूर्ण प्रश्न म्हणजे गोसीखुर्द कालव्याचे पाणी शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. परंतु गोसीखुर्दच्या कामासाठी आतापर्यंत जो निधी मिळाला तो मी आणला आहे, असे बोलले जात आहे. पण त्यानंतरच्या पूर्णत्वास कामास लागणारी निधी कोण आणणार, हे मात्र उमेदवारांकडून सांगितले जात नाही. त्यामुळे केवळ शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम उमेदवारांकडून केले जात आहे. सर्वसामान्य मतदार गर्दीमध्ये हे सारे मूग गिळून ऐकूण घेताना दिसत आहे. हे विशेष.(प्रतिनिधी)