शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

जनता करिअर लाँचरचा निकाल बनावट

By admin | Updated: May 30, 2015 01:34 IST

जनता करिअर लाँचरच्या नावाने आयआयटी आणि वैद्यकीय पूर्वपरीक्षेचे शिकवणी वर्ग घेणाऱ्या जनता करिअर लाँंचरच्या संचालकांनी नापास झालेल्या विद्यार्र्थ्यांना ...

चंद्रपूर : जनता करिअर लाँचरच्या नावाने आयआयटी आणि वैद्यकीय पूर्वपरीक्षेचे शिकवणी वर्ग घेणाऱ्या जनता करिअर लाँंचरच्या संचालकांनी नापास झालेल्या विद्यार्र्थ्यांना पास झाल्याचे दाखवून पालक आणि विद्यार्थ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक राजू कुकडे यांनी पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणी जनता करिअर लाँचरच्या संचालकांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.कुकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय माध्यमिक बोर्डाने अलीकडेच २७ एप्रिलला जेईई (मेन) २०१५ चे निकाल जाहीर केले होते. या परीक्षेत आपल्या जनता करिअर लाँचरमधील पैकीच्या पैकी म्हणजे १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचे त्यांनी जाहिरातीमधून दाखविले होते. प्रत्यक्षात जाहिरातीमध्ये प्रकाशित केलेल्या १८ विद्यार्थ्यांपैकी १३ विद्यार्थी जेईई (मेन) परीक्षा उत्तीर्णच झाले नसल्याचा आरोप कुकडे यांनी केला. त्यापैकी नऊ विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका आपल्या हाती लागल्याचा दावाही त्यांनी केला आहे. बनावट निकाल दाखवून विदर्भातील विद्यार्थी आणि पालकांची दिशाभूल करण्याचा प्रकार येथे सुरू आहे. विद्यार्थ्यांचा आपल्या संस्थेत प्रवेश मिळवून त्यांच्याकडून वारेमाप शुल्क वसूल केली जाते, असाही आरोप त्यांनी केला आहे. जनता करिअर लाँचरचे संचालक असलेले डॉ. अशोक जीवतोडे यांच्यावर कारवाई करण्यासाठी त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे. या सोबतच, शिक्षणमंत्री, शिक्षण उपसंचालकांकडेही तक्रारी केल्याची माहिती त्यांनी दिली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)आरोप पूर्णत: खोटे - जीवतोडेजनता करिअर लाँचरचे संचालक डॉ. अशोक जीवतोडे यांची या संदर्भात प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले, आमची संस्था जबाबदार आहे. त्यामुळे असा प्रकार संस्थेकडून होऊच शकत नाही. लवकरच दहावीच्या परीक्षेचे निकाल आहेत. त्यामुळे विद्यार्थी ओढण्याच्या स्पर्धेतून हा घाणेरडा आरोप कुकडे यांच्या माध्यमातून करण्यात आला आहे. संस्थेने परिश्रमातून नावलौकिक मिळविला आहे. मात्र आपल्या बदनामीसाठी स्पर्धकांकडून हा घाणेरडा आरोप केला जात असल्याचे ते म्हणाले.बनावट निकालाची पोलिसांकडून चौकशी या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांशी संपर्क साधला असता, खोटा निकाल दाखवून फसवणूक करण्याप्रकरणी आयएनसाईट या संस्थेविरोधात तक्रार यापूर्वी आली होती, त्या संदर्भात चौकशी सुरु असल्याचे ते म्हणाले. आयएनसाईट या संस्थेतील विद्यार्थ्यांची तक्रार आपल्याकडे नाही. तसेच सुट्या असल्याने विद्यार्थीही बाहेर आहेत. विद्यार्थी परतताच त्यांचेही बयाण घेतले जाईल, असे ते म्हणाले. जनता करिअर लाँचरसंर्भातही काल तक्रार आली आहे. त्याचीही चौकशी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.