विरूर स्टेशन येथे ऑक्सिजन बेडची सुविधा द्या : सुभाष धोटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:29 IST2021-05-11T04:29:06+5:302021-05-11T04:29:06+5:30

येथे ऑक्सिजन बेडची निर्मिती करून स्थानिक परिसरातील गोरगरीब कोरोना रुग्णांना दिलासा मिळण्यासाठी आपण प्रयत्न करू. कोरोनाच्या बिकट परिस्थितीत आशाधामसारखे ...

Provide Oxygen Bed at Virur Station: Subhash Dhote | विरूर स्टेशन येथे ऑक्सिजन बेडची सुविधा द्या : सुभाष धोटे

विरूर स्टेशन येथे ऑक्सिजन बेडची सुविधा द्या : सुभाष धोटे

येथे ऑक्सिजन बेडची निर्मिती करून स्थानिक परिसरातील गोरगरीब कोरोना रुग्णांना दिलासा मिळण्यासाठी आपण प्रयत्न करू. कोरोनाच्या बिकट परिस्थितीत आशाधामसारखे रुग्णालय मदत करण्यास तयार आहे. येथे परिसरातील कोरोना रुग्णांसाठी एक निस्वार्थ आधार प्राप्त होत आहे. येथील एकूण परिस्थिती लक्षात घेता या ठिकाणी प्राणवायूयुक्त खाटांची निर्मिती करण्यात यावी, अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना आमदार धोटे यांनी दिल्या.

याप्रसंगी उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, तहसीलदार हरीष गाडे, सरपंच भाग्यश्री आत्राम, अजय रेड्डी, बोंडे गुरुजी, सोनू सिंग, इरफान सय्यद, राकेश रामटेके, मंगेश पावडे, ज्ञानेश्वर गोरे, प्रवीण चिडे, विलास आक्केवार, पवार, नामदेव चिडे, अजित सिंग, बाबुराव फटाले, कवडू दोरखंडे, संगेश पावडे, मोतीराम डोब्बलवार यांसह आशाधाम रुग्णालयाचे पदाधिकारी, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Provide Oxygen Bed at Virur Station: Subhash Dhote