शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
4
"खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
5
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
6
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
7
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
8
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
9
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
11
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
12
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
13
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
14
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
15
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
16
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
17
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
18
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
19
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
20
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे निषेध आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:21 IST

चंद्रपूर : केंद्रातील मोदी सरकारने मागील सात वर्षांत सर्वसामान्य जनतेच्या हिताचे कोणतेही निर्णय घेतलेले नाही. देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. ...

चंद्रपूर : केंद्रातील मोदी सरकारने मागील सात वर्षांत सर्वसामान्य जनतेच्या हिताचे कोणतेही निर्णय घेतलेले नाही. देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. कोरोना साथरोग नियोजनात अपयश आले आहे. पेट्रोल, डिझेलची दररोज भाववाढ होत आहे. नोटबंदी, जीएसटीसारखे अपयशी निर्णय घेतले. बेरोजगारी वाढली आहे. शेतकरीविरोधात काळे कायदे करण्यात आले. मोदी सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे. त्यामुळे मागील सात वर्षांत देशात काळोखच पसरला असल्याची टीका चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केली आहे.

चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या मार्गदर्शनात रविवारी कस्तुरबा चौकात केंद्र सरकारविरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, महिला काँग्रेसच्या प्रदेश महासचिव नम्रता आचार्य-ठेमस्कर, महिला काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्ष सुनिता अग्रवाल, नगरसेविका सुनिता लोढिया, अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश महासचिव अ‍ॅड. मलिक शाकिर, उमाकांत धांडे, ओबीसी विभागाचे शहर अध्यक्ष नरेंद्र बोबडे यांनी केंद्र सरकारच्या धोरणांचा खरपूस समाचार घेतला.

यावेळी काळ्या रंगाचा मुखवटा असलेल्या प्रतिकात्मक पुतळ्यावर केंद्र सरकारच्या अपयशाच्या विषयांचे फलक लावण्यात आले होते.

प्रास्ताविक गोपाल अमृतकर यांनी, तर आभार एनएसयुआयचे प्रदेश महासचिव कुणाल चहारे यांनी मानले.

आंदोलनात ज्येष्ठ नेते विनोद दत्तात्रय, कामगार नेते के. के. सिंग, अनुसूचित जाती प्रदेश उपाध्यक्ष अश्विनी खोब्रागडे, अनुसूचित जाती आघाडीच्या अनुताई दहेगावकर, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष सोहेल शेख, माजी नगरसेवक संतोष लहामगे, नगरसेविका ललिता रेवल्लीवार, माजी नगरसेवक प्रवीण पडवेकर, माजी नगरसेवक प्रसन्ना शिरवार आदी सहभागी झाले होते.