आयुष मंत्रालयाच्या अध्यादेशाचा चंद्रपुरात निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:43 IST2020-12-12T04:43:56+5:302020-12-12T04:43:56+5:30

चंद्रपूर : केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयाने पोस्ट ग्रॅज्युएट आयुर्वेदिक व्यावसायिकांना ५८ विविध शस्त्रक्रिया करण्याची परवानगी एका अध्यादेशाद्वारे प्रदान केली. ...

Protest against the ordinance of the Ministry of AYUSH in Chandrapur | आयुष मंत्रालयाच्या अध्यादेशाचा चंद्रपुरात निषेध

आयुष मंत्रालयाच्या अध्यादेशाचा चंद्रपुरात निषेध

चंद्रपूर : केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयाने पोस्ट ग्रॅज्युएट आयुर्वेदिक व्यावसायिकांना ५८ विविध शस्त्रक्रिया करण्याची परवानगी एका अध्यादेशाद्वारे प्रदान केली. विषयाचा संपूर्ण देशात विरोध होत असून इंडियन मेडिकल असोसिएशनने शुक्रवारी देशव्यापी बंद पुकारला. या बंदमध्ये चंद्रपुरातील ४५० डॉक्टर्सनी सहभाग नोंदवून केंद्र शासनाच्या धोरणाचा निषेध केला.

चंद्रपुरातील खासगी दवाखाने सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आले होते. आयएमएचे चंद्रपूर शाखा अध्यक्ष डॉक्टर अनिल माडूरवार, डॉ. मंगेश गुलवाडे, सचिव सुरभी मेहरा, कोषाध्यक्ष डॉ. अजय दुधलवार यांच्या नेतृत्वात बंद पाळण्यात आला. यामध्ये विशेषत्वाने चंद्रपूर मेडिकल कॉलेजच्या पाचशे विद्यार्थ्यांनीही सहभाग नोंदविला. कोविडच्या संकटात आयएमए च्य राज्यभरातील डॉक्टरांनी सेवा दिली. आधुनिक वैद्यकशास्त्रात भारतीय डॉक्टर जगभरात आघाडीवर आहेत भारतीय डॉक्टर जागतिक आरोग्य यंत्रणेच्या विकासाला हातभार लावत असताना केंद्र शासनाने असा निर्णय घेणे कल्पनेच्या पलीकडे आहे. शासनाने हा निर्णय त्वरित रद्द करावा, केंद्र शासनाने नॅशनल मेडिकल कमिशन गठित करून ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेदिक आणि युनानी या सर्व पॅथींना एकत्र करून अभ्यासक्रम बनविण्यासाठी चार समित्या तयार केल्या. केंद्र शासनाचे हे पाऊल डॉक्टर्ससाठी धोकादायक आहे. त्यामुळे केंद्र शासनाने या समित्या रद्द कराव्या, मिक्सपॅथीचे धोरण अंमलात आणू नये, अशी मागणीही आयएमएचे अध्यक्ष डॉ. माडुरवार यांनी केली.

Web Title: Protest against the ordinance of the Ministry of AYUSH in Chandrapur