शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

विविध ठिकाणी मोर्चा काढून निषेध

By admin | Updated: January 23, 2016 01:10 IST

१८ जानेवारीला तेलंगाणा येथील हैद्राबाद विद्यापीठात पीएचडीसाठी शिक्षण घेत असलेल्या रोहित वेमू या विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले.

दलित विद्यार्थी आत्महत्या प्रकरण : चंद्रपूर, कोठारीत मोर्चा, राजुऱ्यात कॅण्डल मार्चचंद्रपूर : १८ जानेवारीला तेलंगाणा येथील हैद्राबाद विद्यापीठात पीएचडीसाठी शिक्षण घेत असलेल्या रोहित वेमू या विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले. या घटनेमुळे दलित समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. सर्वत्र मोर्चे, आंदोलन करून शासनाच्या मुस्कटदाबीचा कडकडीत निषेध सुरू आहे. त्याच अनुषंगाने आज शुक्रवारी चंद्रपूर व कोठारीत मोर्चा तर गडचांदुरात कॅण्डल मार्च काढून निषेध नोंदविण्यात आला.दलित विद्यार्थ्यांस विद्यापिठात दिली जाणारी वागणूक अमानवीय असल्याने त्याविरुद्धात आवाज उठविण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना निलंबित करून त्यांना वसतीगृहातून हाकलून देण्यात आले. हे सहन होऊ न शकल्याने रोहित वेमू या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. त्याच्या अंतिम संस्काराची माहितीही त्याच्या कुटुंबियांनाही देण्यात आली नाही. परिणामी या घटनेचा सर्वत्र निषेध सुरू आहे. त्याचे पडसाद चंद्रपूर जिल्ह्यातही उमटत आहेत. चंद्रपुरात दुपारी १ वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर दलित समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. कोठारीतही मोर्चाचे आयोजन करून बल्लारपूरचे नायब तहसिलदार विकास अहीर यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात रोहित वेमू दलित असल्याने आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या विद्यापीठ प्रशासनातील समाजकंटकांना त्वरित अटक करून कठोर शिक्षा करण्यात यावी, मानव संसाधन मंत्री स्मृती ईराणी यांचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा, दलित विद्यार्थ्यांना संरक्षण पुरविण्यात यावे, दोन्ही केंद्रीय मंत्र्यांच्या फोन संभाषणाची सखोल चौकशी करण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलनात राजकुमार परेकर, शुभम खोब्रागडे, धिरज बांबोडे, शैलेश रामटेके, प्रमोद खोब्रागडे, वेणुदास खोब्रागडे, संदीप यावलीकर, विनोद बुटले, अमोल कातकर यांच्यासह शेकडो समाजबांधव सहभागी झाले होते.यासोबतच माजी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात युवक काँग्रेसच्या वतीने राजुऱ्यात कॅण्डल मार्च काढून रोहित वेमूला श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. कॅण्डल मार्चमध्ये यावेळी युवक काँग्रेसचा राष्ट्रीय सचिव हरिक्रिष्णा पूजाला, शिवा राव, अरुण धोटे, विनोद दत्तात्रय, आशिष देरकर, आदी सहभागी झाले होते.