मूल : लोकमत सखी मंच मूलच्या वतीने गरीब व गरजू महिलांना मदतीचा हात देता यावा, या उद्देशाने कपडा बँकेची निर्मिती नुकतीच करण्यात आली. जनकल्याण शिक्षण संस्थेच्या कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन सेवानिवृत्त शिक्षिका पुष्पा बोकारे यांच्या हस्ते झाले. तर अध्यक्षस्थानी तालुका सखी मंचच्या संयोजिका जयश्री चन्नुरवार होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून मनिषा सिरस्कर, कल्पना मेश्राम, आरेकर आदी उपस्थित होत्या. लोकमतचे संस्थापक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेला मार्ल्यापण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी गरजू व गरीब महिलांना साड्यांचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}