शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 05:01 IST

जिल्ह्यात काही गावांत सिंचनाची सुविधा आहे. अनेक शेतकरी सिंचन करून दुबार पीक घेत आहेत. नगदी पीक म्हणून भाजीपाल्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते. कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी शासनाकडून प्रतिबंधात्मक विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. या उपाययोजनेमध्ये आठवडी बाजार बंद करण्याच्या निर्णयाचा समावेश असल्याने हिरवी मिरची, टमाटर, वांगे, पालेभाज्या, फुलकोबींचे मोठे नुकसान होत आहे.

ठळक मुद्देबाजार बंद : संसर्ग होऊ नये म्हणून प्रशासनाच्या उपाययोजना

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी नेहमीच अडचणीत सापडत आहे, अशातच शेतकऱ्यांच्या अडचणीत कोरोनानेही भर घातली आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून प्रशासनाने आठवडी बाजार बंद केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा भाजीपाला जागेवरच पडून राहत असल्याने मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.जिल्ह्यात काही गावांत सिंचनाची सुविधा आहे. अनेक शेतकरी सिंचन करून दुबार पीक घेत आहेत. नगदी पीक म्हणून भाजीपाल्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते. कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी शासनाकडून प्रतिबंधात्मक विविध उपाययोजना राबविल्या जात आहे. या उपाययोजनेमध्ये आठवडी बाजार बंद करण्याच्या निर्णयाचा समावेश असल्याने हिरवी मिरची, टमाटर, वांगे, पालेभाज्या, फुलकोबींचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यावर्षी पावसाळ्यात झालेल्या दमदार पावसामुळे जलसाठ्यात बºयापैकी वाढ झाली आहे. नदीपात्रात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे नदीकाठाशेजारील शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याच्या पिकाची लागवट केली आहे.कोरोनाच्या सावटामुळे शहरातील बाजारात तसेच आठवडी बाजारतही शुकशुकाट असतो.परिणामी त्यांचे मोठे नुकसान होत आहे. विशेष म्हणजे, शहराशेजारी असलेल्या बहुतांश शेतकऱ्यांकडे भाजीपाला पिकतो. त्यामुळे ते गावात सुद्धा ग्राहक मिळेनासे झाले आहे.शेतकऱ्यांना आर्थिक फटकाशहराजवळील शेतकरी आपला शेतमाल विकण्यासाठी आणतात. मात्र जागतिक स्तरावर कोरोनाचा होणारा प्रादूर्भाव रोखण्यासाठी शासनाने सार्वजनिक ठिकाणासह आठवडी बाजारावर बंदी आणली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या काळणीवर आलेला भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान होत आहे. भाजीपाला पीक कमी वेळात होणार असल्यामुळे तो वेळेवर काढून वेळेवर मार्केटमध्ये पोहोचण्याची धडपड शेतकºयांमध्ये असते. मात्र शहरातील आठवडी बाजार बंद असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. एकतर संचारबंदीमुळे घराबाहेर पडणे बंद आहे. त्यामुळे रोजगार मिळेनासा झाला आहे. त्यामुळे आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी