शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत आतापर्यंत ८.१ टक्के मतदान;पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान हातबॉम्ब फेकले; अनेक जखमी
2
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
3
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
4
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
5
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
6
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
7
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
8
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
9
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
10
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
11
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
12
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
13
महिला क्रिकेटरचा 'हनीट्रॅप' गेम! व्यावसायिकाला ६३ लाखांना लुटले, मुंबई पोलिसांनी श्रीनगरमधून उचलले
14
"रिद्धी खूप खूश झाली अन्..." राकेश बापटने सांगितली एक्स वाईफची कशी होती प्रतिक्रिया
15
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
16
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
17
‘पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणे म्हणजे थेट १४० कोटी भारतीयांचा अपमान’, एकनाथ शिंदेंची खर्गेंवर टीका
18
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
19
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
20
बाल्कनीतून कबुतरांना हटवण्याचा सर्वात सोपा अन् प्रभावी उपाय; समस्येतून मिळेल कायमचा तोडगा
Daily Top 2Weekly Top 5

प्रस्तावात विकास योजनांनाच प्राधान्य द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 06:00 IST

पालकमंत्री वडेट्टीवार पुढे म्हणाले, कृषी विभागाचा आढावा घेताना सूक्ष्म सिंचनासारख्या योजनांकडे अधिक लक्ष द्यावे. केंद्र्र व राज्य शासनाच्या अनेक योजना जिल्ह्यामध्ये राबविला जात आहे. मात्र शेतकऱ्यांना स्वावलंबीत्व देणारी रचना यातून निर्माण करणे हे प्रशासनाचे काम असल्याचेही त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : विविध विभागांचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्र्रपूर : जिल्ह्यातील बेरोजगारी, प्रदूषण, सिंचन क्षमता आणि उत्तम आरोग्य व्यवस्था या समस्यांना प्राधान्य देणारे प्रस्ताव जिल्हा विकास निधीमध्ये समाविष्ट झाले पाहिजे. जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या प्राथमिक सुविधांवर आधारित प्रस्ताव सादर करा, असे निर्देश राज्याचे मदत व पूनर्वसन, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिन विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत दिले.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, महानगरपालिकेचे आयुक्त संजय काकडे, उपजिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी योगेश कुंभेजकर, बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक राहुल पाटील, नियोजन अधिकारी ग. रू. वायाळ, समाज कल्याण विभागाचे उपायुक्त प्रसाद कुलकर्णी, उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.पालकमंत्री वडेट्टीवार पुढे म्हणाले, कृषी विभागाचा आढावा घेताना सूक्ष्म सिंचनासारख्या योजनांकडे अधिक लक्ष द्यावे. केंद्र्र व राज्य शासनाच्या अनेक योजना जिल्ह्यामध्ये राबविला जात आहे. मात्र शेतकऱ्यांना स्वावलंबीत्व देणारी रचना यातून निर्माण करणे हे प्रशासनाचे काम असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी जलयुक्त शिवार योजनेतून जिल्ह्याच्या पाणी पातळीमध्ये किती वाढ झाली, याबाबतचा आढावा घेतला. आसोलामेंढा येथील सिंचन व पर्यटन प्रकल्पाबाबत चर्चा केली. चांदा ते बांदा योजनेच्या कामांची माहिती घेतली. मेडिकल कॉलेज, खनिकर्म विभाग, जिल्हा पुरवठा कार्यालय, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभाग, आदी विभागांचा यावेळी आढावा घेतला.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवार