शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धाराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
4
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
5
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
6
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
7
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
8
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
9
अजब लग्नाची गजब कहाणी, ६६ वर्षांच्या आजोबांनी नातीच्या वयाच्या तरुणीसोबत लग्न 
10
भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी
11
Maharashtra Din 2026 Wishes: महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मराठमोळा सण
12
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
13
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
14
१ मे वैशाख पौर्णिमा: रात्री ९ ते १२ दरम्यान करा 'हा' सोपा उपाय; चंद्र देव पूर्ण करतील सर्व इच्छा!
15
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
16
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
17
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
18
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
19
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
20
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
Daily Top 2Weekly Top 5

गोंडवाना विद्यापीठाच्या भरती प्रक्रियेला स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 05:01 IST

गोंडवाना विद्यापीठातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहायक प्राध्यापक पदभरतीविरूद्ध गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य व स्थायी समिती सदस्य अ‍ॅड. गोविंदराव भेंडारकर, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, प्रवीण घोसेकर, विशाल पानसे व इतर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती.

ठळक मुद्देउच्च न्यायालयाचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : गोंडवाना विद्यापीठाने प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहायक प्राध्यापक पदाच्या ३६ रिक्त पदांसाठी २० मार्च २०२० रोजी जाहिरात प्रकाशित करून अर्ज मागविले होते. परंतु या जाहिरातीमध्ये ओबीसी प्रवगार्साठी एकही जागा नसल्यामुळे ओबीसी समजात नाराजी होती. यासंदर्भात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या नियुक्ती प्रक्रियेला मंगळवारी स्थगिती दिली.गोंडवाना विद्यापीठातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहायक प्राध्यापक पदभरतीविरूद्ध गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य व स्थायी समिती सदस्य अ‍ॅड. गोविंदराव भेंडारकर, ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, प्रवीण घोसेकर, विशाल पानसे व इतर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती.सदर याचिकेवर न्यायमूर्ती रवी देशपांडे व न्यायमूर्ती विनय जोशी यांच्या खंडपीठाने भरती प्रकियेतील नियुक्तीला मंगळवारी स्थगिती दिली राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. तायवाडे व उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर, अ‍ॅड. गोविंदराव भेंडारकर यांनी शासनाकडे पाठपुरावा केला आहे. अर्जदाराच्या वतीने अ‍ॅड. पुरूषोत्तम पाटील व विद्यापीठाचे वतीने भानुदास कुलकर्णी व अ‍ॅड. नीरजा चौबे यांनी काम पाहिले. पदभरती होणार असल्यामुळे उमेदवारांमध्ये आनंद व्यक्त केला जात होता. मात्र स्थगितीमुळे विरजन पडले आहे.

टॅग्स :universityविद्यापीठ