शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
3
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
4
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
5
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
6
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
7
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
8
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
9
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
10
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
11
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
12
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
13
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
14
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
15
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
16
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
17
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
18
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
19
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
Daily Top 2Weekly Top 5

निराश्रितांची कदापि उपासमार होऊ देणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 05:01 IST

यावेळी नगराध्यक्ष रिता उराडे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष खेमराज तिडके, प्रभाकर सलोकर, प्रमोद चिमुरकर, नितीन उराडे, विलास विखार, सुधीर राऊत, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिंदे, तहसीलदार पवार, नगर परिषदेचे मुख्याधिकारी वासकर आदी उपस्थित होते.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार । ४० हजार कुटुंबांना मोफत अन्नधान्य वाटपाला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : लॉकडाऊनमुळे निराश्रितांची कदापि उपासमार होऊ देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे मदत व पुनर्वसन तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टवार यांनी केले. जिल्ह्यातील ४० हजार निराश्रित कुटुंबांना मोफत अन्नधान्य वाटप कार्यक्रमात ते शनिवारी बोलत होते. हा उपक्रम १५ दिवस सुरू राहणार आहे.यावेळी नगराध्यक्ष रिता उराडे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष खेमराज तिडके, प्रभाकर सलोकर, प्रमोद चिमुरकर, नितीन उराडे, विलास विखार, सुधीर राऊत, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिंदे, तहसीलदार पवार, नगर परिषदेचे मुख्याधिकारी वासकर आदी उपस्थित होते. सावली व सिंदेवाही तालुक्यात रविवार तर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ६ एप्रिलपासून टप्पाटप्प्याने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. यावेळी बंडू श्याम वाघाडे, मुक्ता महादेव वैरकर, गोविंदा बाबुराव मडावी, प्रिया प्रमोद राऊत, यमुना गोविंदा राऊत आदींसह ५० गरजुंना धान्य व जीवनावश्यक किट देण्यात आले. रविवारी सिंदेवाही व सावली तालुक्यात, ६ एप्रिलपासून चंद्रपूर, बल्लारपूर तालुक्यात वस्तुंचे किट वाटप होणार आहे. यामध्ये १० किलो तांदूळ, २ किलो तूर डाळ, १ किलो खाद्य तेल, २०० ग्राम मिरची पावडर, ५० ग्राम हळद पावडर, १ किलो मीठ, साबण आदी जीवनावश्यक वस्तुंचा समावेश आहे ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाहीत अशाही गरजू लोकांसाठी शासकीय योजनव्यतिरिक्त स्वखर्चातुन ४० हजार कुटुंबांना वस्तुंचे किट देण्यात येणार आहे.शिवभोजन थाळीकेंद्राचे उद्घाटनब्रह्मपुरी तालुक्यातील गोरगरीब नागरिकांसाठी कमी दरात भोजन सेवा उपलब्ध करून देणाऱ्या शिवभोजन थाळी केंद्राचे उद्घाटन शनिवारी झाशी राणी चौक ब्रह्मपुरी येथे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते पार पडले. या केंद्रातून दररोज १०० थाळी वितरित होणार आहे. ही थाळी अवघ्या ५ रूपयात मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री वडेट्टीवार यांनी दिली.