शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ नागरिक संघाच्या निवडणुकीला राजकीय रंग

By admin | Updated: January 16, 2016 01:20 IST

येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या १९ जानेवारीला होऊ घातलेल्या निवडणुकीला राजकीय रंग चढत आहे.

चंद्रपूर : येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या १९ जानेवारीला होऊ घातलेल्या निवडणुकीला राजकीय रंग चढत आहे. या संघाच्या संचालक मंडळासाठी प्रथमच निवडणुका होत असून प्रचार, भेटीगाठी, सभा आणि आरोप-प्रत्यारोपामुळे या निवडणुकीला राजकीय रंग चढत आहे.३ हजार ७६४ सदस्यसंख्या असलेल्या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये प्रथमच दोन पॅनल उभे ठाकल्याने मतदान पद्धतीने यावेळी निवडणुका होत आहेत. यात एकूण १५ संचालक आहेत. सत्ताधाऱ्यांचे विकास पॅनल आणि विरोधकांचे परिवर्तन पॅनल असे दोन पॅनल रिंगणात उतरले आहेत. या दोन्ही पॅनलने सर्व जागांवर उमेदवार उभे केले असून एक अपक्ष उमेदवारही निवडणूक लढवित आहे. त्यामुळे रिंगणातील उमेदवारांची संख्या ३१ झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अ‍ॅड. पुनमचंद वाकडे काम पहात आहेत.ज्येष्ठ नागरिक संघाच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ तीन वर्षांचा असतानाही २००९ नंतर येथे निवडणुका झालेल्या नाहीत. ही बाब धर्मदाय आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्यावर त्यांनी निवडणुकीचे आदेश दिले. या सोबत आर्थिक व्यवहारावरून कार्यकारिणीतील संचालकांमध्ये वाद निर्माण झाला होता. त्यामळे दोन तट पडले. परिणामत: ज्येष्ठ नागरिक संघ प्रथमच निवडणुकीला सामोरा जात आहे. या दोन्ही पॅनलकडून निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू आहे. परिवर्तन पॅनल गोपाळराव सातपुते यांच्या नेतृत्वात लढत असून त्यांनी भविष्यात स्वच्छ आणि पारदर्शी प्रशासन देण्याचा दावा केला आहे. या संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत या गटाने सत्ताधाऱ्यांवर आर्थिक स्वरूपाचे आरोप केले. मागील अनेक वर्षात ज्येष्ठ नागरिक संघ वाढविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही वाव दिला जात नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. संघाच्या घटनेचा अवमान करून आजवर कामकाज चालविण्यात आल्याचा आरोपही पत्रकार परिषदेत करण्यात आला.दरम्यान, विकास पॅनलनेही शुक्रवारी पत्रकार परिषद घेवून आपली भूमिका मांडली. विजय चंदावार म्हणाले, ज्येष्ठ नागरिक संघ वाढविण्यासाठी कुणी मेहनत केली हे सर्वांना माहीत आहे. सर्व राजकीय नेत्यांचे सहकार्य घेवून आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्यात आले. ज्येष्ठ नागरिक संघाची कार्यकारणी सर्वानुमते निवडण्यात यावी यासाठी प्रयत्न करण्यात आला. मात्र काही सदस्यांनी धर्मदाय आयुक्तांकडे तक्रारी करून निवडणुकीची मागणी केली. त्यामुळे निवडणूक घ्यावी लागली, असे ते म्हणाले. प्रथमच होत असलेल्या या निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)