बूथ कमिटीचे नियोजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:30 IST2021-08-26T04:30:15+5:302021-08-26T04:30:15+5:30

चंद्रपूर : देशात मोठ्या प्रमाणत महागाई वाढली आहे. बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड रोष व्यक्त ...

Plan a booth committee | बूथ कमिटीचे नियोजन करा

बूथ कमिटीचे नियोजन करा

चंद्रपूर : देशात मोठ्या प्रमाणत महागाई वाढली आहे. बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे लोकांमध्ये प्रचंड रोष व्यक्त होत आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर पंचायत निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार निवडूनआणण्याकरिता बूथ कमिटीचे नियोजन करून काँग्रेस पक्षाची संघटना मजबूत करावी, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी केले. स्थानिक हिराई विश्रामगृह दुर्गापूर आणि ऊर्जानगर जि.प. क्षेत्रातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक नुकतीच पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीत बूथ कमिट्या मजबूत करणे आदी संघटनात्मक बाबींचा आढावा घेण्यात आला. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष चित्रा डांगे, युवक विधानसभा अध्यक्ष राजेश अदूर, जिल्हा महासचिव प्रमोद बोरीकर, युवक इंटक अध्यक्ष प्रशांत भारती, ऊर्जानगरच्या सरपंच मंजुषा येरगुडे, दुर्गापूरच्या सरपंच सविता मानकर, महिला तालुकाध्यक्ष सायली देठे, छोटा नागपूरचे उपसरपंच रिषभ दुपारे, अनिल फाले, मुन्ना आवळे, सुजोद नले, मुसभाई, भगत आदी उपस्थित होते.

Web Title: Plan a booth committee