दिव्यांगांना समान संधी व हक्क द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:41 IST2020-12-13T04:41:16+5:302020-12-13T04:41:16+5:30

संजय हेडाऊ : गटसाधन केंद्रात जागतिक दिव्यांग दिन राजुरा : दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रत्येक ठिकाणी समान संधी समान हक्क ...

People with disabilities should be given equal opportunities and rights | दिव्यांगांना समान संधी व हक्क द्यावी

दिव्यांगांना समान संधी व हक्क द्यावी

संजय हेडाऊ : गटसाधन केंद्रात जागतिक दिव्यांग दिन

राजुरा : दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रत्येक ठिकाणी समान संधी समान हक्क मिळाल्यास ते संधीचे सोने करतील. ते कुठेही मागे पडणार नाही. यातूनचत ते आपल्यातील कला कौशल्याची छाप पाडल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन शिक्षण विस्तार अधिकारी संजय हेडाऊ यांनी केले.जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.

प्राचार्य धनंजय चापले, गटशिक्षणाधिकारी विजय परचाके यांच्या मार्गदर्शनातगटसाधन केंद्र पंचायत समितीत पार पडलेल्या जागतिक दिव्यांग दिन कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जि. प. शाळेचे मुख्याध्यापक मनोहर वाघमारे, शिक्षण विस्तार अधिकारी श्रीराम मेश्राम व शिक्षण तज्ज्ञ देवेंद्र राहांगडाले, आशिष बहाद्दूरे, विशेष शिक्षक राजकुमार भुरे, दिवाकर चाचरकर, मंगला सोमलकर, मनीषा वांदिले, मुसा शेख, राकेश रामटेके, सुर्यकांत ढगे, गीता जांबुलवार, रिता देरकर, ज्योती गुरनुले, राहुल रामटेके उपस्थित होते. मान्यवरांनी दिव्यागांचे प्रकार, समाजामध्ये असणारे गैरसमज व अंधश्रद्धा , दिव्यांग विद्यार्थ्यांची सर्वच क्षेत्रात होणारी प्रगती व या बाबतचे अनुभव याबद्दलची माहिती दिली. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सुंदर हस्ताक्षर, चित्रकला व नृत्य स्पर्धा आॅनलाईन पद्धतीने घेण्यात आली.

Web Title: People with disabilities should be given equal opportunities and rights