शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

मनमानी शालेय शुल्कविरोधात पालकांना तक्रार करता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:20 IST

मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद या पाच विभागांत महाराष्ट्र शैक्षणिक शुल्क अधिनियम समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये ...

मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद या पाच विभागांत महाराष्ट्र शैक्षणिक शुल्क अधिनियम समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये सेवानिवृत्त न्यायाधीश, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ अधिकारी यांचा समावेश आहे. शिवाय सनदी लेखापालांच्या नियुक्तीमुळे शैक्षणिक संस्थेचे आर्थिक व्यवहार तांत्रिकदृष्ट्या तपासण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे संस्थेच्या मनमानी कारभाराला चाप बसेल, असा दावा अधिकारी करीत आहेत. ६ जुलै २०२१ च्या शासन निर्णयानुसार सर्व समित्यांच्या पदसिद्ध सदस्य सचिवांना समित्यांचे कामकाज तत्काळ सुरू करण्याबाबत पुन:निरीक्षण सूचना देण्यात आल्या. शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रत्येकाला शिक्षण मिळालेच पाहिजे, असे शासनाचे धोरण आहे. काेराेनामुळे गेली दोन वर्षे विद्यार्थ्यांचा शालेय फी संदर्भात फारच मोठा प्रश्न निर्माण झाला. कोरोनाच्या संकटामुळे विद्यार्थ्यांचे शालेय शुल्क भरणे पालकांना आर्थिक संकटामुळे शक्य झाले नाही. त्यातच अनेक शाळांनी शुल्कात वाढ केली होती. यासंदर्भात पालकांनी शालेय विभागाकडे अनेक तक्रारी केल्या आहेत.

चंद्रपुरात समितीच अस्तित्वात नाही

शुल्क वाढीबाबत दाद मागण्याची तरतूद महाराष्ट्र शुल्क विनियमन अधिनियमात आहे. परंतु अशा समित्याच गठित झाल्या नाही, तर पालकांना न्याय कसा मिळणार, हा प्रश्न आहे. ज्या शाळांनी शालेय शुल्क वाढ केली आहे अशा शाळांच्या निर्णयाविरुद्ध पालकांना शुल्क वाढीबाबत आता अपील करता येणार, अशी तरतूद आहे. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यात अजूनही अशी समिती गठित करण्यात आली नाही.

कोट

राज्य शासनाने महाराष्ट्र शुल्क विनियमन अधिनियम तयार केला. ही चांगली बाब आहे. मात्र, अशा समित्या प्रत्येक जिल्ह्यात गठित झाल्या पाहिजेत. अन्यथा निर्णयाला अर्थ उरत नाही. चंद्रपूर जिल्ह्यात ही समितीच नसल्याने पालक कुणाकडे तक्रारी करणार, हा प्रश्न आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने यावर तातडीने निर्णय घेतला पाहिजे.

- मनोज लडके, सचिव पॅरेंट्स असोसिएशन फॉर चिल्ड्रेन एज्युकेशन, चंद्रपूर