शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

पालावरची शाळा अचानक बेपत्ता

By admin | Updated: December 19, 2015 00:51 IST

पिढ्यान्पिढ्या शिक्षणापासून वंचित असणाऱ्यांच्या मुलांसाठी वरोरा शिक्षण विभागाने मोठ्या प्रयत्नाने शिक्षणाची द्वारे उघडून पालावरची शाळा एक महिन्यापूर्वी वरोरा शहरानजीक सुरू केली.

शिक्षक हिरमुसले : भटकंती करणाऱ्यांच्या मुलांसाठी सुरू होती शाळावरोरा : पिढ्यान्पिढ्या शिक्षणापासून वंचित असणाऱ्यांच्या मुलांसाठी वरोरा शिक्षण विभागाने मोठ्या प्रयत्नाने शिक्षणाची द्वारे उघडून पालावरची शाळा एक महिन्यापूर्वी वरोरा शहरानजीक सुरू केली. एक महिन्यापासून शाळा नियमित सुरू असल्याने शाळेतील विद्यार्थी शिक्षणात चांगले रमले. मात्र शाळेतील विद्यार्थी आपल्या कुटुंबासह अचानक बेपत्ता झाल्याने पालावरची शाळा आता कायमची बंद झाली आहे. नेहमीप्रमाणे शिक्षक शाळेत गेले असता विद्यार्थी व शाळेसाठी उभारलेल्या पालही दिसेनासा झाल्याने महिनाभर विद्यार्थ्यांसोबत रमणारे शिक्षकही नाराज होवून परत गेले.दिवाळीपूर्वी नोव्हेंबर महिन्यात नागपूर-चंद्रपूर मार्गालगत वरोरा शहरानजीक जडीबुटी विकणारी २५ कुटुंब येवून झोपड्या उभारुन राहू लागले. झोपडीमधील पुरुष मंडळी दिवसभर शहरात जडीबुटी विकायचे तर स्त्रीया व मुले झोपडी परिसरात राहायचे. या झोपड्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुलंमुली असल्याने ते शाळाबाह्य राहू नये, याकरीता वरोरा शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी आर.आर. चव्हाण व त्यांचे सहकारी तसेच जि.प. सदस्य नितीन मत्ते यांनी पुढाकार घेत झोपडीमध्ये राहणाऱ्या कुटुंबियांशी जवळीकता साधली. त्यांना विश्वासात घेण्याकरीता दिवसाळीच्या दिवसात वरोरा शहरात फिरुन फराळाचे साहित्य गोळा करुन त्यांना वाटले. विश्वास संपादन झाल्यावर इथली मुले शिक्षणापासून वंचित राहू नये, याकरीता नियोजन करुन १४ नोव्हेंबरपासून ५२ विद्यार्थी संख्या असलेली पालावरची शाळा सुरू करण्यात आली. प्रारंभी शाळा झोपडी वजा घरात घेण्यात आल्यानंतर पालक उत्साही झाले. त्यांनी वेगळा पाल उभा करुन दिला. दिवाळीच्या सुट्टया असतानाही त्यांनी वेगळा पाल उभा करुन दिला. दिवाळीच्या सुट्टया असतानाही बीआरसी विषय तज्ञांनी या शाळेत नियमित वर्ग घेणे सुरू केले. शिक्षण विभाग व समाजातील दाणी व्यक्तीकडून पालावरच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करुन शाळेतील विद्यार्थ्यांची शिक्षण विभागाने रितसर नोंदही करुन घेतली. मागील एक महिन्यापासून पालावरची शाळा नियमित सुरू असल्याने विद्यार्थी पालावरच्या शाळेतील मूल शिक्षणासोबतच इतरही कार्यक्रम शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे सादर करीत होते. ते आपली नावे पाटीवर अचूकपणे लिहित असल्याने आम्हालाही शिकवा, अशी गळ पालावरच्या महिलांनी शिक्षकांना घातली होती, हे विशेष! ५२ शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शिक्षणात सामावून घेत पालावरची शाळा वरोरा शहरात सुरू झाल्याने अनेक तज्ञ व्यक्तींनी या शाळेला भेट दिल्या होत्या. (तालुका प्रतिनिधी)पूर्वसूचना न देताच निघून गेलेपिढ्यान्पिढ्या भटकंती जीवन जगत असल्याने ते शिक्षणापासून वंचित झाले. शिक्षणाची दारे वरोरा शिक्षण विभागाने उघडून देत शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम सुरू झाले होते. ही कुटुंबे भटकणार याची कल्पना शिक्षण विभागाला होती. त्यामुळे त्यांच्या पालकांना तुम्ही जाताना पूर्व सूचना द्या म्हणून शिक्षक वारंवार विनंती करीत होते. परंतु, या विनंतीकडे दुर्लक्ष करीत एकाच रात्री अख्खे कुटुंब स्थालांतरीत झाले. त्यामुळे पालावरची शाळा कायमची बंद पडली. स्थानांतरीत करताना पूर्व सूचना दिली असती तर पुढील गावात त्यांच्या पुढील शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली असती व त्यांचे शिक्षण सुरू राहिले असते.