शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

स्टेरॉईड, सीटी स्कॅनचा अतिवापर कोरोना रुग्णांना घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:00 IST

कोरोनाचा संसर्ग झाल्यावर काही रुग्ण एचआरसीटी चाचणी करण्यासाठी पॅथॉलॉजीत गर्दी करीत आहेत. ही चाचणी केल्यास   रुग्णाच्या छातीत किती प्रमाणात संसर्ग झाला, याची माहिती मिळते. मात्र, सौम्य लक्षणे असली तरी सीटी स्कॅन करणे घातक आहे. या चाचणीमुळे कॅन्सरसारखा आजार होऊ शकतो, असा इशारा डॉ. रणदीप गुलेरिया यांच्यासारखे प्रसिद्ध आरोग्यतज्ज्ञ  देत आहेत. 

ठळक मुद्देकोरोनाची पार्श्वभूमी : लक्षणे नसणाऱ्यांनी टाळावा सीटी स्कॅन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काही डॉक्टर सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांनाही स्टेरॉईड, सीटी स्कॅन करण्याचा सल्ला देत आहेत. मात्र, स्टेरॉईड, सीटी स्कॅनचा अतिवापर कर्करोगाला आमंत्रण देणारा असल्याचे  कोरोना राज्य टास्क पोर्स समितीने नुकताच दिला. त्यामुळे सौम्य व लक्षणे नसणाऱ्या रुग्णांच्या कुटुंबीयांनी शक्यतो, अशा चाचण्या टाळण्याचे आवाहन आरोग्य प्रशासनाने केले आहे. कोरोनाचा संसर्ग झाल्यावर काही रुग्ण एचआरसीटी चाचणी करण्यासाठी पॅथॉलॉजीत गर्दी करीत आहेत. ही चाचणी केल्यास   रुग्णाच्या छातीत किती प्रमाणात संसर्ग झाला, याची माहिती मिळते. मात्र, सौम्य लक्षणे असली तरी सीटी स्कॅन करणे घातक आहे. या चाचणीमुळे कॅन्सरसारखा आजार होऊ शकतो, असा इशारा डॉ. रणदीप गुलेरिया यांच्यासारखे प्रसिद्ध आरोग्यतज्ज्ञ  देत आहेत. सौम्य लक्षणे असलेले कोविड पॉझिटिव्ह आढळल्यास चंद्रपूर शहरातील काही रुग्ण खासगी डॉक्टरांचा सल्ला घेत आहेत. गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांना काही डॉक्टर एचआरसीटी चाचणी करण्याचा सल्ला देत आहेत. त्यामुळे पॅथाॅलॉजीमध्ये प्रचंड गर्दी दिसून येते. 

आजारांचा धोकायुवा अवस्थेत उत्सर्जित विकिरणांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांना उतारवयात कर्करोगासारखे आजार होऊ शकतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सीटी स्कॅन करणे धोकादायक आहे.   कोविडची सामान्य लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.   काही रुग्णांचा आजार गृहविलगीकरणात राहून उपचार घेतल्यावरही बरा होऊ शकतो, अशी माहिती जि. प. आरोग्य विभागाने दिली.दम लागत असेल, ऑक्सिजन पातळी खाली जात असेल तर अशाप्रकारची चाचणी उपयुक्त ठरू शकते.

एक सीटी स्कॅन म्हणजे ८० ते १४० एक्स-रे एक सीटी स्कॅन काढणे म्हणजे रुग्णाच्या छातीचे ८० ते १४० एक्स-रे काढण्यासारखे आहे. त्यामुळे कोविड पॉझिटिव्ह आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला न घेता आपल्याच मर्जीने सीटी स्कॅन काढणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. रेडिएशनमुळे कॅन्सर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. युवा अवस्थेत उत्सर्जित विकिरणांच्या संपर्कात आल्यास उतारवयात धोका वाढतो.११०० सीटी स्कॅन होतात दररोजजिल्ह्यात दररोज ११०० सीटी स्कॅन होत असल्याचा अंदाज आहे. चंद्रपूर शहरात चार हॉस्पिटलला सीटी स्कॅनसाठी मान्यता आली. रुग्ण वाढल्याने काही हॉस्पिटलमध्ये सकाळी ७ वाजेपासूनच गर्दी होते. १६ स्लाईडखालील सीटी स्कॅनसाठी २००० रुपये, १६ ते ६४ स्लाईड सीटी स्कॅनला २५०० तर ६५ पेक्षा अधिक स्लाईड सीटी स्कॅनसाठी ३००० रुपये शुल्क आकारले जात आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटल