शहरं
Join us  
Trending Stories
1
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
2
"राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
3
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
4
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
5
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
6
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
7
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
8
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
9
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
11
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
12
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
13
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
14
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
15
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
16
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
17
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
18
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
19
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
20
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 

साथीच्या आजारांचे खापर वटवाघुळांवर फोडणे धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 5:00 AM

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर भारतात, महाराष्ट्रात व जगभरात वटवाघूळ अभ्यासक्षेत्रात नेमके काय चालले आहे, यासंदर्भात माहिती देताना अनिरूद्ध चावजी म्हणाले, वटवाघूळांच्या जगात १११, भारतात १२९ आणि महाराष्ट्रात सुमारे ५० जाती आहेत. प्राणीशास्त्रानुसार वटवाघूळांचे मायक्रोबॅट व मेगाबॅट या दोन प्रकारात वर्गीकरण केल्या जाते. त्यामध्ये कीटकभक्ष्यी व फळभक्ष्यी या प्रकारांना अतिशय महत्त्व आहे.

ठळक मुद्देवटवाघूळतज्ज्ञ अनिरूद्ध चावजी : जगभरातील वटवाघुळांच्या वसाहती उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर

राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : भारतीय आणि जगाच्या पाठीवरील काही देशांमध्ये वटवाघूळ हा निरूपद्री, दिसायला अत्यंत कुरूप, झाडाला उलटा लटकणारा व रात्री संचार करणारा निशाचर म्हणून अशास्त्रीय व विविध धर्मप्रेरित मिथकांचा सातत्याने बळी ठरत आला आहे. वटवाघूळ स्वत:हून कुणाच्या वाट्याला जात नाही. निसर्गातील त्याची उपयुक्तता सर्वविदीत आहे. बहुतांश प्राणी-पक्ष्यांमध्ये विषाणू असतात, वटवाघूळातही आहेत. निपाह व्हायरसपासून तर कोरोना व्हायरससाठी वटवाघूळेच जबाबदार असल्याचे अद्याप सिद्ध झाले नाही. मात्र, निसर्गातील मानवी हस्तक्षेप दुर्लक्षित करून साथीच्या आजारांचे खापर केवळ वटवाघूळांवरच फोडणे सुरू राहिल्यास जगभरातील वटवाघूळांच्या वसाहती उद्ध्वस्त होतील, असा दावा ताडोबा राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पातील वन्यजीव व वटवाघूळ अभ्यासक अनिरूद्ध चावजी यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर भारतात, महाराष्ट्रात व जगभरात वटवाघूळ अभ्यासक्षेत्रात नेमके काय चालले आहे, यासंदर्भात माहिती देताना अनिरूद्ध चावजी म्हणाले, वटवाघूळांच्या जगात १११, भारतात १२९ आणि महाराष्ट्रात सुमारे ५० जाती आहेत. प्राणीशास्त्रानुसार वटवाघूळांचे मायक्रोबॅट व मेगाबॅट या दोन प्रकारात वर्गीकरण केल्या जाते. त्यामध्ये कीटकभक्ष्यी व फळभक्ष्यी या प्रकारांना अतिशय महत्त्व आहे. वटवाघूळांच्या पंखांना बोटं व उपांग असतात. वटवाघूळांवर विषाणूंचा फारसा अनिष्ट परिणाम होत नसल्याचे आतापर्यंतच्या अभ्यासातून आढळून आले आहे. ते स्वत: आजारी न पडता कित्येक प्रकारच्या विषाणूंना आश्रय देऊ शकतात. कोरोनासारख्या विषाणूंचे यजमानही तेच असल्याचा केवळ संशय घेतला जात आहे. पण अद्याप सिद्ध झाले नाही, असेही ते म्हणाले.चुका मानवाच्या, आरोपीच्या पिंजऱ्यात ‘वटवाघूळ’२०१९ मध्ये सार्स कोविड-२ या आजाराची साथ आली होती. तिचा संबंध चीनच्या वुहानमधील माणसांना खाण्यासाठी मांडलेल्या जिवंत प्राण्यांच्या ‘वेट मार्केट’ शी असल्याचे मानले जाते. मात्र, नंतर झालेल्या अभ्यासातून त्या रोगाचा प्रसारस्त्रोत अन्य प्राण्यांत आढळल्याचे सिद्ध झाले. यात सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा की हे प्राणी अशा बाजारात आणले कुणी. खरे तर मानवाचा आणि वटवाघूळांचा अधिवास पूर्णत: वेगळा आहे. त्यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेने जगभरातील ‘ओले बाजार’ बंद करा, अशा सूचना दिल्या आहेत. वटवाघूळांच्या वसाहती उद्ध्वस्त झाल्या तर किटकांची संख्या प्रचंड वाढेल. यातून पिकांच्या उत्पादनात मोठी घट होऊन मानवी जीवनावर दुष्परिणाम होईल. त्यामुळे मानवाने चुका टाळून वटवाघूळांना आरोपीच्या पिंजºयात टाकण्यापेक्षा निसर्गातील हस्तक्षेप टाळला पाहिजे, असा सल्ला वटवाघूळ तज्ज्ञ अनिरूद्ध चावजी यांनी दिला.वटवाघुळांची उपयोगितावटवाघूळांमध्ये २० टक्के फळभक्ष्यी व ८० कीटकभक्ष्यी असतात. फळभक्ष्यी वटवाघूळांमुळे निसर्गाची परिसंस्था निरोगी राहते. बहुविध फळ-झाडांची बियाणे रूजविण्याचे काम वटवाघूळांकडून विष्ठेद्वारे होते. हा उडणारा एकमेव सस्तन प्राणी आहे. वटवाघूळे मार्गक्रमण व शिकारीसाठी प्रतिध्वनी स्थाननिर्धारण तंत्र म्हणजे ‘इको-लोकेशन’चा वापर करतात. या तंत्राद्धारे एका तासात १,२०० व एका रात्री सहा ते सात हजार डासांच्या आकाराचे किटक खाऊ शकतात. रात्री अंधारात पाण्यातून मासे पकडू शकतात, इतके चित्तथरारक तंत्रज्ञान त्याला अवगत आहे. ‘नाईट व्हीजन’ कसे असते, हे मानवाने वटवाघूळाकडून शिकण्याची गरज आहे, अशी माहिती चावजी यांनी दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या