शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
4
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
5
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
6
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
7
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
8
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
9
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
10
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
11
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
12
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
13
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
14
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
15
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
16
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
17
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
18
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
19
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
20
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
Daily Top 2Weekly Top 5

८५ हजार ४८४ पैकी ७५ हजार ५०९ चाचण्या निगेटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 05:00 IST

विशेष म्हणजे, यातील एक हजार ६९ चाचण्यांचा अहवाल अद्यापही यायचा आहे तर आठ हजार ४९९ चाचण्या पॉझिटिव्ह ठरल्या आहेत. प्रारंभी कोरोनाचा संसर्ग हा बाहेर जिल्ह्यातून किंवा बाहेर राज्यातून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांमुळे होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे बाहेरून आलेल्यांना होम क्वारंटाईन किंवा इन्स्टिट्युशन क्वारंटाईन करणे सुरू झाले.

ठळक मुद्देइच्छाशक्ती वाढवा : १०६९ चाचण्यांच्या अहवालाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने चाचण्यांचा वेग वाढविला आहे. ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यात दुपटीने चाचण्या करण्यात येत आहेत. आता थोडेफार लक्षणे दिसत असतील तर नागरिकही स्वयंस्फूर्तीने चाचण्या करू लागले आहेत. जिल्ह्यात बुधवारपर्यंत ८५ हजार ४८४ जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यातील तब्बल ७५ हजार ५०९ चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत.विशेष म्हणजे, यातील एक हजार ६९ चाचण्यांचा अहवाल अद्यापही यायचा आहे तर आठ हजार ४९९ चाचण्या पॉझिटिव्ह ठरल्या आहेत. प्रारंभी कोरोनाचा संसर्ग हा बाहेर जिल्ह्यातून किंवा बाहेर राज्यातून जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांमुळे होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे बाहेरून आलेल्यांना होम क्वारंटाईन किंवा इन्स्टिट्युशन क्वारंटाईन करणे सुरू झाले. यातील लक्षणे दिसत असलेल्या नागरिकांचे स्वॅब घेऊन कोरोना चाचणी केली जात होती. मात्र आता संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या सर्वांच्याच चाचण्या केल्या जात आहे.कोरोना काळात आतापर्यंत बाहेरून चंद्रपूर जिल्ह्यात ९६ हजार ५३७ नागरिक दाखल झाले. या सर्वांना क्वारंटाईन केल्यानंतर ९६ हजार ४२ नागरिकांना काहीही लक्षणे नसल्याने मुक्त करण्यात आले. सध्या केवळ ४९५ नागरिक क्वारंटाईन आहेत. त्यांच्यावर प्रशासनाची देखरेख आहे.जिल्ह्यात आतापर्यंत ८५ हजार ४८४ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यात ४१ हजार ८६० चाचण्या प्रयोगशाळेतून झाल्या तर ४३ हजार ६२४ चाचण्या अ‍ॅन्टिजेन प्रणालीद्वारे करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, या चाचण्यांमधून तब्बल ७५ हजार ५०९ चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. तर आठ हजार ४९९ जणांच्या चाचणी पॉझिटिव्ह आल्या आहेत. एक हजार ६९ चाचण्यांचा अहवाल यायचा असून ४०७ चाचण्यांबाबत संभ्रम आहे.संपर्कातून होत आहे संसर्गचंद्रपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातच आता कोरोना संसर्ग जोरदार वाढू लागला आहे. यात चिंतेची बाब अशी की हा संसर्ग संपर्कातून होत आहे. कोणत्याही प्रवासाची पार्श्वभूमी नसलेले व्यक्ती कोरोना बाधित म्हणून पुढे येत आहे. ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभापासून कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. कोरोनासोबतच जगताना अनेक नियमांचे पालन करणे सर्वांनाच बंधनकारक आहे. सामाजिक हितासाठी असे करणे सर्वांची जबाबदारी आहे. बाधितांमध्ये तरुणांची संख्या अधिक असली तरी कोरोनाचा संसर्ग सर्व वयोगटातील व्यक्तींना होत आहे. त्यामुळे आता सर्वांनीच काळजी घेणे आवश्यक झाले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या