शहरं
Join us  
Trending Stories
1
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
2
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
3
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
4
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
5
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
6
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
7
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
8
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
9
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
10
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
11
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
12
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
13
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
14
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
15
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
16
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
17
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
18
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
19
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
20
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
Daily Top 2Weekly Top 5

युवकांना पोलीस योद्धा म्हणून काम करण्याची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:00 IST

पोलिसांवर इतर गुन्हांचा तपास, बंदोबस्त नाकाबंदी, कंटेन्मेंट झोन बंदोबस्त, कोविड केअर सेंटर बंदोबस्त, हॉस्पिटल बंदोबस्त, बाहेर राज्यातून व जिल्ह्यातून आलेले प्रवासी यांची तपासणी, बंदोबस्त व पोलीस ड्युटीचा ताण आहे. यासोबतच जिल्ह्यातील कोरोना बाधित व त्याचा संपर्कात आलेल्या व्यक्तीवर विशेष लक्ष द्यावे लागत आहे. तसेच स्वत:च्या कुटुंबाची सुध्दा जबाबदारी पार पाडवी लागते.

ठळक मुद्देयुवकांनी सहभागी व्हावे ; चंद्रपूर जिल्हा पोलिसांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावित आहेत. मात्र त्यांच्यावर इतर कामांचाही ताण असतो. त्यामुळे युवकांनी पोलीस योद्धा म्हणून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस विभागातर्फे करण्यात आले आहे.पोलिसांवर इतर गुन्हांचा तपास, बंदोबस्त नाकाबंदी, कंटेन्मेंट झोन बंदोबस्त, कोविड केअर सेंटर बंदोबस्त, हॉस्पिटल बंदोबस्त, बाहेर राज्यातून व जिल्ह्यातून आलेले प्रवासी यांची तपासणी, बंदोबस्त व पोलीस ड्युटीचा ताण आहे. यासोबतच जिल्ह्यातील कोरोना बाधित व त्याचा संपर्कात आलेल्या व्यक्तीवर विशेष लक्ष द्यावे लागत आहे. तसेच स्वत:च्या कुटुंबाची सुध्दा जबाबदारी पार पाडवी लागते. त्यामुळे त्यांना सहकार्य करण्साठी पोलीस योद्धा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमातंर्गत समाजातील युवकांना पोलिसांबरोबर नि:स्वार्थपणे १५ दिवसांकरिता पोलीस योद्धा म्हणून सेवा बजावण्याची संधी मिळणार आहे. पोलीस योद्धा तरूणांना चंद्रपूर जिल्हा पोलिसांकडून सन्मान प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. सामाजिक कार्यात रूची असणाऱ्या व पोलिसांच्या कार्यात मदत करू इच्छिणाºया युवकांनी कोरोना आपत्तीत पुढे येऊन पोलीस विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन चंद्रपूर पोलीस विभागातर्फे करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Policeपोलिस