शहरं
Join us  
Trending Stories
1
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
2
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
3
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
4
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
5
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
6
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
7
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
8
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
9
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
10
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
11
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
12
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
13
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
14
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
15
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
16
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
17
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
18
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
19
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
20
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

एक काठी, दोन बिबट अन् ८३ वर्षाचा ‘तरुण’ !

By admin | Updated: December 13, 2014 01:15 IST

रात्रीची स्मशान शांतता. सर्वत्र अंधार. आवाज होता केवळ जमिनीवर आदळणाऱ्या बिबट्याच्या शेपटीचा. बिबट आणि ८३ वर्षाचे आजोबा समोरासमोर.

सचिन सरपटवार भद्रावती
रात्रीची स्मशान शांतता. सर्वत्र अंधार. आवाज होता केवळ जमिनीवर आदळणाऱ्या बिबट्याच्या शेपटीचा. बिबट आणि ८३ वर्षाचे आजोबा समोरासमोर. दोघांमध्ये अंतर केवळ आठ फुटांचे. बिबट खाली बसला अन् आजोबा हातात काठी घेऊन उभे झाले. दोघेही शांत होते. तब्बल एक तास नजरेला नजर भिडवून. काही वेळानंतर बिबट निघून गेला. त्यानंतर पहाटेच्या सुमारास पुन्हा दोन बिबट आणि आजोबा समोरासमोर. आता मात्र एका बिबट्याने हल्ला चढविला. न भीता, न घाबरता केवळ काठीच्या साहाय्याने दोन्ही बिबट्यांना आजोबांनी पळवून लावले.
ही परिकथेतील गोष्ट नाही. तर, भद्रावती तालुक्यातील तिरवंजा (मो.) या गावात घडलेली घटना आहे. बिबट्याशी झुंज देणाऱ्या या ८३ वर्षांच्या आजोबाचे लक्ष्मण नारायण येरगुडे असे नाव आहे.
वयाने म्हातारे पण मनाने ‘तरुण’ असलेले लक्ष्मण येरगुडे यांनी धैर्य, हिंमत व स्फूर्तीने बिबट्यांशी दिलेली झुंज इतरांचे मनोबल वाढविणारी आहे. ज्या जनावरांना वाचविण्यासाठी त्यांनी स्वत:चा जीव धोक्यात टाकला त्याच जनावरांच्या प्रेमामुळे बिबट्यांशी लढण्याची स्फूर्ती मिळाल्याचे येरगुडे यांनी सांगितले.
सायंकाळी ७ वाजता बिबट तिरवंजा गावात शिरला. उद्धव येरगुडेच्या मालकीच्या कालबडीवर त्याने हल्ला केला. मारोती क्षीरसागर यांच्या हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी गावकऱ्यांना सांगितले. त्यानंतर ग्रामस्थांनी बिबट्याचा ‘हाका’ केला अन् बिबट तेथून पळून गेला. दरम्यान, लक्ष्मण येरगुडे गावालगत असलेल्या आपल्या शेतात जागली करायला निघाले. त्यांच्या शेतातील मांडवात सात बैल, ११ गाई आणि ११ म्हैशी असे २९ जनावरे बांधुन होते.
येरगुडे शेतातील मचाणीवर गेले. तेव्हा त्यांना गाई-म्हशी बुजाडण्याचा आवाज आला. ते मचाणीवरून खाली आले.तेव्हा बघते तर काय, चक्क आठ फुटावर बिबट. बिबट हल्ला करेल म्हणून त्यांनी आवाज केला नाही अन् जागेवरून हललेही नाही. तब्बल एका तासापर्यंत दोघेही एकमेकांकडे टकटक बघत होते. तेवढ्यात दुसरा बिबट काट्यातून बाहेर येऊन त्याने बांधून असलेल्या वासरावर झेप घेतली. आवाजामुळे बिबट त्या दिशेने गेला आणि वासराला मांडवाच्या दूर नेऊन ताव मारणे सुरु केले. येरगुडे यांनी गावात येऊन गावकऱ्यांना घटनेची माहिती दिली. अजून किती जनावर मारेल, या भीतीने येरगुडे कुटुंब, गावकरी, गार्ड रंगारी आदी घटनास्थळावर गेले. या सर्र्वांनी रात्र शेतात काढली. तेव्हा बिबट आला नाही. मात्र पहाटेच्या सुमारास ग्रामस्थ गावात गेले. सकाळी लक्ष्मण येरगुडे मृत कालवड शोधत असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. शेपूट मारून त्यांना खाली पाडले. त्यानंतर लगेच उभे झाले. काठी घेतली ‘पिपड्डे महाराज की जय’ असे म्हणून काठी बिबट्याच्या कानपटात मारली. तीन काठ्या मारल्या अन् बिबट निघून गेला. तेवढ्यात दुसऱ्या बिबट्याने म्हैस व वगाराला जखमी केले. अन् ते बिबट्याचे पिल्लू तोंड फाडून येरगुडेवर हल्ला करण्यासाठी झेपावले. क्षणाचाही विलंब न करता येरगुडेंनी त्यांच्या हातातील काठी त्या पिल्लाच्या तोंडात घातली. त्याच क्षणी ते बिबट्याचे पिल्लू पळून गेले. घटनेनंतर वन विभागाने घटनास्थळावर कॅमेरे लावले. दुसऱ्या दिवशी रात्री पुन्हा बिबट घटनास्थळावर येवून त्या मृत कालवडीला ओढत नेल्याचे कॅमेरात बंदिस्त झाले.