पुलावरून ट्रक कोसळून एक ठार, दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:21 IST2021-05-28T04:21:49+5:302021-05-28T04:21:49+5:30

देवाडा : राजुरा तालुक्यातील सोंडो गावापासून काही अंतरावर असलेल्या लोखंडी पुलाच्या वळणावर एक ट्रक पुलावरून अंदाजे ५० फूट खाली ...

One killed, two injured as truck falls off bridge | पुलावरून ट्रक कोसळून एक ठार, दोघे जखमी

पुलावरून ट्रक कोसळून एक ठार, दोघे जखमी

देवाडा : राजुरा तालुक्यातील सोंडो गावापासून काही अंतरावर असलेल्या लोखंडी पुलाच्या वळणावर एक ट्रक पुलावरून अंदाजे ५० फूट खाली कोसळला. यात एक जण जागीच ठार तर दोघे जखमी झाले. ही घटना गुरुवारी दुपारी १.३० वाजता घडली.

रवी तल्लू असे मृताचे नाव आहे तर रवीकुमार चौरसिया व जाणिकराव अशी जखमींची नावे असून सर्व जण छत्तीसगड राज्यातील रहिवासी असल्याचे समजते. सदर ट्रक (क्रमांक सीजी २९ एल ०५८५) आसिफाबाद येथून चंद्रपूरकडे येत होता. दरम्यान, सोंडोगावाजळच्या लोखंडी पुलाच्या वळणावरून नियंत्रण सुटून ट्रक पुलाखाली कोसळला. यात रवी तल्लू हा जागीच ठार झाला तर रवीकुमार चाैरसिया व जाणीकराव जखमी झाले. दोघांना राजुरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पुढील तपास पोलीस करीत आहे,

Web Title: One killed, two injured as truck falls off bridge