शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
2
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
3
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
4
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
5
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
6
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
7
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
8
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
9
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
10
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
11
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
12
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
13
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
14
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
15
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
16
नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षांनंतर राजकारणातून निवृत्त करणार का?: रमेश चेन्नीथला यांचा सवाल
17
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
18
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
19
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
20
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा

चंद्रपूर जिल्ह्यात कोंडवाड्याचे रूपांतर चक्क वाचनालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 10:53 AM

चंद्रपूर तालुक्यातील मंगी (बु.) गावाच्या मध्यभागी असलेल्या कोंडवाड्याचे रूपांतर अतिशय कल्पकतेने सार्वजनिक वाचनालयात करण्यात आले आहे.

ठळक मुद्देराजुरा तालुक्यातील मंगी गावाचा उपक्रम

बी. यू. बोर्डेवार

 लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : तालुक्यातील स्मार्ट ग्राम, मंगी (बु.) हे एक विकासाचे प्रेरणादायी मॉडेल ठरत आहे. नालीमुक्त पण शोषखड्डेयुक्त गाव, गावकऱ्यांची नियमित पहाटे ४.३० वाजता श्रमदानातून स्वच्छता, सौंदर्याने व फुलांनी नटलेला बगीचा असे या गावाचे वैशिष्ट्य आहे. विशेष म्हणजे गावाच्या मध्यभागी असलेल्या कोंडवाड्याचे रूपांतर अतिशय कल्पकतेने सार्वजनिक वाचनालयात करण्यात आले आहे.

गावातील शालेय परिसर सुंदर ठेवण्यात आला आहे. शालेय परिसरातील आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असलेली व्यायामशाळा आहे. गावाचे १०० टक्के कोरोना लसीकरण झाले आहे. स्मार्ट ग्राम, मंगी (बु.) येथील सातत्याने चालणाऱ्या श्रमदानाची व विकासकामांची पाहणी करण्यासाठी भंडारा येथील अशोक लेलॅन्ड कंपनीचे युनिट हेड जोशी व त्यांचे असलेले मित्र मेंढे आणि पुरंदरे तसेच या चमूसोबत अंबुजा सिमेंट फाऊंडेशनचे कार्यक्रम व्यवस्थापक श्रीकांत कुंभारे तथा जितेंद्र बैस, संतोष विश्रोजवार तथा ज्योती खंडाळे यांनी गावाला भेट दिली.             माजी उपसरपंच वासुदेव चापले यांनी स्मार्ट ग्राम तयार होण्याचा प्रवास कसा झाला, हे सांगताना सन २०१२ पासून ग्रामस्थ व युवक सातत्याने दररोज पहाटे दोन तास ग्राम स्वच्छतेसाठी श्रमदान करीत आहेत. ही बाब अभ्यास दौऱ्यातून पाहणी करताना स्वच्छता पाहून पाहुणे मंडळी भारावली.

गावात २,२५० वृक्षांचे रोपण व संवर्धन

नालीमुक्त पण शोषखड्डेयुक्त गाव, सुंदर व मनमोहक बगीचा, सुंदर प्रवेशव्दार ही गावाची वैशिष्ट्ये तर आहेतच, सोबतच गावाच्या परिसरात २,२५० वृक्षांचे रोपण व संवर्धन करण्यात आले आहे. स्वच्छ शालेय परिसर, शाळा बंद पण शिक्षण सुरू उपक्रमाची अंमलबजावणी, १०० टक्के करवसुली, युवक - युवतींसाठी विविध स्वयंरोजगाराच्या अनुषंगाने प्रशिक्षण वर्ग, शाळा व अंगणवाडी आयएसओ होण्यासाठीचे नियोजन इत्यादी नावीन्यपूर्ण उपक्रमही राबविण्यात आले आहेत.

टॅग्स :Governmentसरकार