शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

अर्धवट नाली खोदकामामुळे वाहतुकीला अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 23:17 IST

चिमूर मार्गावर सुरू असलेल्या नालीचे खोदकाम मागील एक महिन्यापासून अर्धवट आहे. यामुळे नागरिकांना ये-जा करण्यास आणि वाहनांच्या रहदारीला अडथळा निर्माण झाला आहे. गावातील सांडपाणी वाहून जाण्यासाठी नालीचे बांधकाम सुरू करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कमासळ (बु.) : चिमूर मार्गावर सुरू असलेल्या नालीचे खोदकाम मागील एक महिन्यापासून अर्धवट आहे. यामुळे नागरिकांना ये-जा करण्यास आणि वाहनांच्या रहदारीला अडथळा निर्माण झाला आहे.गावातील सांडपाणी वाहून जाण्यासाठी नालीचे बांधकाम सुरू करण्यात आले.कंत्राटदाराने नाली खोदून काम बंद केले. मुख्य रस्त्याला लागूनच नालीचे खोदकाम झाल्याने नागरिकांची गोची झाली. बाजुलाच आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे कार्यालय आहे. तेथील पंटागणात पिण्याच्या पाण्याची विहीर व कृषी केंंद्र असल्यामुळे नागरिकांनी तात्पुरती सुविधा करून पुढे जात आहेत. पण, वाहने तसेच बैलबंडी नेता येत नाही. याच मार्गाने विद्यार्थी दररोज शाळेत जातात. नालीचे खोदकाम तीन ते चार फूट खोल आणि तेवढीच रुंदी आहे.रात्रीच्या सुमारास मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नालीचे खोदकाम करून एक काम बंद करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. परिसरातील लोेकप्रतिनिधी याच मार्गावरून तालुकास्थळी जातात. पण, याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. मुख्य मार्गावरील या धोकादायक नालीमुळे, विद्यार्थी शेतकरी व गावकरी त्रस्त आहे.संबंधित विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोका पाहणी करून बांधकाम पूर्ण करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी निवेदनातून केली आहे.