प्रासंगिक करारासाठी एसटी महामंडळाला मिळाले उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 05:00 AM2019-11-11T05:00:00+5:302019-11-11T05:00:16+5:30

लवकरच प्रासंगिक कराराबाबत उद्दिष्टे ठरवून दिले जाणार आहेत. सदर उद्दिष्टे साध्य करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने आपल्या स्तरावर प्रयत्न करण्याचे निर्देश एसटी महामंडळाने दिले आहेत. विभागीय स्तरावर गत आर्थिक वर्षात झालेल्या प्रासंगिक कराराचा आढावा घेऊ न ज्या शैक्षणिक संस्थानी यापूर्वी एसटी बस घेतली होती.

Objectives of ST corporation for incidental agreement | प्रासंगिक करारासाठी एसटी महामंडळाला मिळाले उद्दिष्ट

प्रासंगिक करारासाठी एसटी महामंडळाला मिळाले उद्दिष्ट

Next
ठळक मुद्देउत्पन्न वाढीसाठी प्रयत्न : विभागीय नियंत्रण पर्यवेक्षकाकडे पालकत्व

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : लग्न, यात्रा, धार्मिक व शैक्षणिक सहलीकरीता प्रासंगिक करारावर एसटी बसेस उपलब्ध करून देण्याचे प्रमाण वाढवून एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढावे, यासाठी एसटी महामंडळामार्फत नियोजन करण्यात येत आहे. त्या अंतर्गत विभागीय पातळीवरील अधिकार, पर्यवेक्षकांची पालक अधिकारी म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. याकरिता लवकरच प्रासंगिक कराराबाबत उद्दिष्टे ठरवून दिले जाणार आहेत. सदर उद्दिष्टे साध्य करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने आपल्या स्तरावर प्रयत्न करण्याचे निर्देश एसटी महामंडळाने दिले आहेत.
विभागीय स्तरावर गत आर्थिक वर्षात झालेल्या प्रासंगिक कराराचा आढावा घेऊ न ज्या शैक्षणिक संस्थानी यापूर्वी एसटी बस घेतली होती. अशा संस्थांशी संपर्क साधला जाईल. शैक्षणिक सहलीसाठी बसेस उपलब्ध करून देण्यात येतील. ज्या शैक्षणिक संस्थानी यापूर्वी एसटी महामंडळाची बस न घेता खासगी बसेस वापरल्या असतील, अशा संस्थांशी संपर्क साधून महामंडळाच्या बसेस घेण्याबाबत त्यांना विनंती करावी, विभागीय स्तरावर प्रत्येक आगारासाठी आवश्यकतेप्रमाणे स्वतंत्र दर मंजूर करावेत, कोणत्याही कारणास्तव प्रासंगिक करारावर बसची मागणी नाकारू नये, अशा सूचना राज्य परिवहन महामंडळाने संंबंधित अधिनस्त यंत्रणांना दिल्या आहेत. सुरक्षित प्रवासासाठी

एसटी महामंडळाच्या बसेस घ्याव्यात
प्रासंगिक करारावर बसेस उपलब्ध करून देण्यासाठी कोणती बस मार्गावर बंद पडणार नाही. किंवा कामांसाठी अडचण निर्माण नाही. याची दक्षता घेण्याबाबत कळविण्यात आले आहे. शैक्षणिक संस्था व सामाजिक संस्था किंवा व्यक्तींनी सुरक्षित प्रवासासाठी एसटी महामंडळाच्या बसेस प्रासंगिक करारावर घ्याव्यात, असे आवाहन एसटी महामंडळामार्फत करण्यात आले आहे.

काय आहे प्रासंगिक करार
लग्न सोहळ्यासाठी वऱ्हाडी मंडळींना एसटीने घेऊ प जात असत. तसेच धार्मिक यात्रेसाठी बसेस भाड्याने मिळत असत. याला प्रासंगिक करार असे म्हणतात. गेल्या काही वर्षात खासगी बसेस कंपन्यांनी या क्षेत्रात आगेकूच केल्याने एसटी बसेस भाडेतत्वावर देण्याचे प्रमाण वाढले आणि यातून एसटीचे उत्पन्न वाढावे, यासाठी प्रासंगिक करारावर भर दिला जात आहे.

Web Title: Objectives of ST corporation for incidental agreement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.