पाॅझिटिव्हपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:20 IST2021-07-21T04:20:12+5:302021-07-21T04:20:12+5:30

चंद्रपूर : मागील २४ तासांत जिल्ह्यात दहा जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली, तर ४ जण नव्याने ...

The number of coronaviruses is more than positive | पाॅझिटिव्हपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक

पाॅझिटिव्हपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक

चंद्रपूर : मागील २४ तासांत जिल्ह्यात दहा जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली, तर ४ जण नव्याने बाधित झाले आहेत. जिल्ह्यात मंगळवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.

बाधित आलेल्या रुग्णांमध्ये भद्रावती १, राजुरा १, वरोरा येथील २ रुग्णांचा समावेश आहे, तर

चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्र, चंद्रपूर तालुका, बल्लारपूर

ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, मूल, सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, चिमूर, कोरपना, जिवती या तालुक्यांत एकही रुग्ण आढळून आला नाही.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ८४ हजार ९३९ वर पोहोचली आहे, तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८३ हजार २९७ झाली आहे. सध्या १०९ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ५ लाख ९७ हजार ७५६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ५ लाख ९ हजार ३५९ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ५३३ बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: The number of coronaviruses is more than positive