कोरोना ॲक्टिव्ह रूग्णांची संख्या घसरली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:32 IST2021-08-20T04:32:33+5:302021-08-20T04:32:33+5:30

ॲक्टिव्ह रूग्णांची संख्या घसरून आता ५२ झाली आहे. आतापर्यंत ८७ हजार ३ जण कोरोनापासून बरे झाले आहेत. बाधित आढळलेल्या ...

The number of corona active patients decreased | कोरोना ॲक्टिव्ह रूग्णांची संख्या घसरली

कोरोना ॲक्टिव्ह रूग्णांची संख्या घसरली

ॲक्टिव्ह रूग्णांची संख्या घसरून आता ५२ झाली आहे. आतापर्यंत ८७ हजार ३ जण कोरोनापासून बरे झाले आहेत.

बाधित आढळलेल्या पाच रूग्णांमध्ये चंद्रपूर पालिका क्षेत्रातील २ आणि ब्रम्हपुरी, गोंडपिपरी, जिवती तालुक्यातील प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे. चंद्रपूर, बल्लारपूर, भद्रावती, नागभीड, सिंदेवाही, मूल, सावली, पोंभूर्णा, राजूरा, चिमूर, वरोरा, कोरपना तालुक्यात गुरूवारी एकही रूग्ण आढळला नाही. एकूण बाधितांची संख्या ८८ हजार ५९३ वर पोहोचली आहे. सध्या अॅक्टिव्ह ५२ बाधितांवर उपचार सुरू आहेत. ६ लाख ५४ हजार ५३३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ५ लाख ६४ हजार ५७ नमुने निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत १५३८ बाधितांचे मृत्यू झाले आहे. कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे त्रिसुत्रीचा नियमित वापर करावा, नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Web Title: The number of corona active patients decreased