आता पर्यटकांना घेता येणार खाण पर्यटनाचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 06:00 AM2019-11-14T06:00:00+5:302019-11-14T06:00:37+5:30

चंद्रपूर जिल्हा नैसर्गिक साधन संपत्ती, जगप्रसिद्ध ताडोबा अभयारण्य, तसेच ऐतिहासिक वारशासाठी प्रसिद्ध आहे. याव्यतिरिक्त चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा खाणी विपूल प्रमाणात आहे. या खाणींमध्ये सुरू असलेल्या कामाचे कुतूहल प्रत्येक नागरिकाला तसेच पर्यटकाला असते.

Now tourists can enjoy mining tourism | आता पर्यटकांना घेता येणार खाण पर्यटनाचा आनंद

आता पर्यटकांना घेता येणार खाण पर्यटनाचा आनंद

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे पाऊल : वेकोलि देणार खाणींचा अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : नैसर्गिक साधन संपत्ती तसेच ऐतिहासिक गोष्टीसाठी प्रसिद्ध असणाºया चंद्रपूर जिल्ह्यात पर्यटकांना ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पासोबतच आता खाण पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच तातडीची बैठक पार पडली.
चंद्रपूर जिल्हा नैसर्गिक साधन संपत्ती, जगप्रसिद्ध ताडोबा अभयारण्य, तसेच ऐतिहासिक वारशासाठी प्रसिद्ध आहे. याव्यतिरिक्त चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा खाणी विपूल प्रमाणात आहे. या खाणींमध्ये सुरू असलेल्या कामाचे कुतूहल प्रत्येक नागरिकाला तसेच पर्यटकाला असते. खाणीमध्ये सुरू असलेले काम जाणून घेण्याची जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ तसेच वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड यांच्या सहकार्याने पावले उचलली आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येणाऱ्या पर्यटकाला प्रत्यक्ष खाणीला भेट देऊन खाण पर्यटनाचा आनंद घेता यावा. याकरिता नियोजन करण्याच्या दृष्टीकोनातून बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीला महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ तसेच वेकोलिचे प्रतिनिधी व इको प्रोचे संस्थापक अध्यक्ष बंडू धोतरे उपस्थित होते.

खाणीबाबत प्रत्येकाला उत्सुकता
चंद्रपूर शहराला ब्लॅक गोल्ड सिटी म्हटले जाते. चंद्रपूरसह जिल्ह्यात अनेक कोळसा खाणी आहेत. काही भूमिगत तर काही खुल्या खाणी आहेत. या खाणीत नागरिकांना जाऊ दिले जात नाही. केवळ वेकोलि अधिकारी व कर्मचारीच खाणीत जातात. त्यामुळे या खाणीतील काम कसे चालते, भूमिगत कोळसा खाणी कशा असतात, याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. अनेकांनी तर केवळ चित्रपटामधूनच भूमिगत कोळसा खाणी पाहिल्या आहेत. आता पर्यटक म्हणून नागरिकांनाही कोळसा खाणी पाहून तेथील कामे कशी होतात, हे पाहता येणार आहे.

लवकरच होणार सामंजस्य करार
या बैठकीमध्ये खान पर्यटनात पर्यटकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाने सविस्तर नियोजन करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. तसेच वेस्टन कोलफिल्ड लिमिटेडने खाण पर्यटनाच्या दृष्टीकोनातून वापरता येणाऱ्या कोळसा खाणी शोधाव्यात व त्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठवावा. तसेच पर्यटकाला कोळसा खाणीच्या कार्यप्रणालीची व्हिडीओद्वारे माहिती देण्याची व्यवस्था करावी. सोबतच महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ, वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांचा संयुक्तिक सामंजस्य करार करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिले आहेत.

Web Title: Now tourists can enjoy mining tourism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.