शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

आता शिक्षकांची कागदोपत्री कामापासून होणार सुटका

By admin | Updated: June 26, 2015 01:20 IST

शैक्षणिक गुणवत्ता सुधार कार्यक्रम राज्यभरात चालू सत्रापासून राबविण्यात येणार आहे.

चंद्रपूर : शैक्षणिक गुणवत्ता सुधार कार्यक्रम राज्यभरात चालू सत्रापासून राबविण्यात येणार आहे. यासह शासकीय शाळा गुणवत्तेत माघारण्याची कारणेही शोधली जाऊन उपाययोजना केल्या जाणार आहेत. शिक्षकांच्या मागे असलेली अशैक्षणिक कामे व अध्यापनाऐवजी वाढत असलेल्या कागदी कामाचा व्याप, यासह केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी यांच्यासारखे प्रशासकीय घटक गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांना मार्गदर्शन करण्याऐवजी कागदोपत्री माहितीला देत असलेले प्राधान्य ही गुणवत्ता माघारण्यासाठी एक कारण नक्कीच आहे. त्यामुळे या सत्रापासून शिक्षक व प्रशासकीय घटकांची कागदोपत्री माहितीच्या कामातून सुटका करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे शिक्षण संचालक महावीर माने यांनी दिली आहे. यामुळे शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे.महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेद्वारा आयोजित राज्यस्तरीय गुणवत्ता विकास कार्यशाळेत महावीर माने यांनी ही माहिती दिली. या कार्यशाळेला चंद्रपूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी राज्याध्यक्ष प्रसाद पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून आर.जी. भानारकर, विनायक घटे, शंकर पाटील, मारोती सावंत, विजय भोगेकर, अशोक पाटील, दीपक वऱ्हेकर, राजेश दरेकर उपस्थित होते. यापुढे शाळा सुरुवातीच्या पहिल्या महिन्यात संपूर्ण शाळा, विद्यार्थी व शिक्षकांची माहिती वर्षभरात फक्त एकदाच मागण्यात येईल. शिक्षकांनी या विचाराचे सकारात्मक स्वागत केले आहे. शिक्षक या अध्यापनाऐवजी असलेल्या कागदोपत्री कामाने त्रस्त झाले होते. त्यांचा अध्यापनाचा बराचसा वेळ या कामात वाया जात होता. राज्याचे प्रमुख अधिकारी यांनी याप्रमाणे सकारात्मक विचार करून गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करीत असल्याचे पाहून शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असल्याबाबत यावेळी जिल्ह्यातील शिक्षक हरीश ससनकर, अल्का ठाकरे यांचे शिक्षक संचालक महावीर माने यांच्याकडून कौतुकही करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील मागील सत्रापासून सुरू असलेले शैक्षणिक नवोपक्रम व गुणवत्ता विकासासाठी शिक्षकांचा पुढाकार, यावर हरीश ससनकर यांनी विचार व्यक्त केले. अल्का ठाकरे यांनी शिक्षकांच्या पुढाकारातून व एकजुटीतून गुणवत्तेकडे झेप घेत असलेल्या जिल्ह्यातील शाळांची या कार्यशाळेत उपस्थितांना माहिती दिली. (शहर प्रतिनिधी)