शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेत विविध दाखल्यांसाठी आता सेल्फ सर्व्हिस किऑस्क मशीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:28 IST

: नागरिकांच्या वेळेची बचत होणार भद्रावती : जन्म-मृत्यू प्रमाणपत्र व असेसमेंट प्रत तसेच इतरही दाखले प्राप्त करण्याकरिता नागरिकांना वाट ...

: नागरिकांच्या वेळेची बचत होणार

भद्रावती : जन्म-मृत्यू प्रमाणपत्र व असेसमेंट प्रत तसेच इतरही दाखले प्राप्त करण्याकरिता नागरिकांना वाट पाहावी लागते. अर्जही करावा लागतो. यामध्ये त्यांचा वेळही जातो. या सर्व बाबींचा विचार करता नगर परिषद भद्रावतीतर्फे सेल्फ सर्व्हिस किऑस्क मशीन लावण्यात येणार असून, या मशीनद्वारे नागरिकांना अवघ्या पाच मिनिटांत विविध दाखले प्राप्त होणार आहे.

तसेच मशीनच्या वापराची पद्धत सोपी असल्याने कुठल्याही अडचणी शिवाय सदर मशीनमधून दाखले मिळण्यास मदत होणार आहे.

सेल्फ सर्व्हिस किऑस्क मशीनचा आकार व फंक्शन एटीएम मशीनसारखे आहे. जन्म-मृत्यू प्रमाणपत्र काढण्यासाठी तसेच इतरही प्रमाणपत्र काढण्यासाठी तसेच प्रति प्रमाणपत्र पन्नास रुपये इतके शुल्क मशीनमध्ये टाकल्यानंतर प्रमाणपत्र प्राप्त करता येईल. तसेच मशीनच्या स्क्रीनवर जन्मतारीख व ठिकाण याबाबत विचारणा होऊन त्यावर क्लिक केल्यास आपल्याला संबंधित प्रमाणपत्र प्राप्त होणार आहे .शुल्क फक्त नोटेद्वारेच अदा करता येणार आहे. यामध्ये नाण्यांचा वापर करता येणार नाही. तसेच असेसमेंट प्रत व इतर सेवा उपलब्ध करण्याची सुविधा लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर व मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांनी सांगितले.

येत्या आठवड्यात या मशीनचे उद्घाटन नगर परिषद भद्रावती परिसरात होणार असून, मशीन नागरिकांसाठी २४ तास सुरू राहणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचाही व्याप कमी होणार असून, नागरिकांचा वेळ वाचणार आहे.