शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

आता डाटा एन्ट्री आॅपरेटरच्या कामाचा बोजा वाढणार

By admin | Updated: July 30, 2014 23:55 IST

ग्रामीण भागातील जनतेचे श्रम, वेळ व पैसा वाचावा, याकरिता राज्य शासनाने प्रत्येक ग्राम पंचायतीमध्ये ई- बॅकिंग सेवा सुरू करण्याची मोहिम सुरू केल्यामुळे ग्रामपंचायतमधील डाटा एन्ट्री

पेंढरी(कोके) : ग्रामीण भागातील जनतेचे श्रम, वेळ व पैसा वाचावा, याकरिता राज्य शासनाने प्रत्येक ग्राम पंचायतीमध्ये ई- बॅकिंग सेवा सुरू करण्याची मोहिम सुरू केल्यामुळे ग्रामपंचायतमधील डाटा एन्ट्री आॅपरेटरच्या कामाचा बोजा आता वाढणार आहे. महाआॅनलाईन प्रणालीतर्फे प्रत्येक ग्रामपंचायतीला संगणक परिचालकाची (डाटा एन्ट्री आॅपरेटर) अल्पशा मानधनावर नियुक्ती करण्यात आली. त्या आॅपरेटरद्वारे संगणिकृत रहिवाशी, बीपीएल, नाहरकत प्रमाणपत्र असे १९ प्रकारचे दाखले देण्याचे काम सोपविण्यात आले. आता ग्रामस्तरावर आॅनलाईन ई- बॅकिंग सेवा सुरू होत असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना शहरी भागातील जनतेसारखेच आपआपल्या ग्रामपंचायतीमध्ये संग्राम केंद्राद्वारे पैसा हस्तांतरित करणे, ठेवी स्विकारणे, इलेक्ट्रीक बिल भरणे, मजुरांचे ई- पेंमेट, बँकेत खाते उघडणे, पैसे भरणे, पैसे काढणे, ड्राप्ट बनवणे, कर्ज प्रस्ताव करणे, लाभार्थ्यांना थेट अनुदान वितरित करणे, फोन, मोबाईल देयक भरणे, रेल्वे बस आरक्षण, मोबाईल रिचार्ज इत्यादी सुविधा ग्रामीण जनतेला मिळणार आहे. राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये ई- बॅकिंगची सेवा उपलब्ध करून देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.या सुविधेमुळे राज्यातील तब्बल २१ हजार स्थानिक संगणक आॅपरेटरला काम मिळाले आहे. परंतु त्यांना महाआॅनलाईनकडून आठ हजार मानधन ठरले असताना फक्त तीन हजार ८०० रुपये मानधन दिले जात आहे. तेही तीन- तीन महिने मानधन मिळत नसल्यामुळे व आणखी ई- बँकिंगमुळे कामाचा व्याप व जबाबदारी वाढल्यामुळे मानधन वाढविण्याची त्यांची मागणी आहे.(वार्ताहर)