एकही गाव अंतर्गत रस्त्यांशिवाय राहणार नाही : प्रतिभा धानोरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:32 IST2021-08-20T04:32:42+5:302021-08-20T04:32:42+5:30

भद्रावती : वरोरा-भद्रावती मतदार संघाची लोकप्रतिनिधी या नात्याने वरोरा-भद्रावती तालुक्यातील एकही गाव अंतर्गत रस्त्याशिवाय राहणार नाही. गावातील शंभर टक्केअंतर्गत ...

No village can live without internal roads: Pratibha Dhanorkar | एकही गाव अंतर्गत रस्त्यांशिवाय राहणार नाही : प्रतिभा धानोरकर

एकही गाव अंतर्गत रस्त्यांशिवाय राहणार नाही : प्रतिभा धानोरकर

भद्रावती : वरोरा-भद्रावती मतदार संघाची लोकप्रतिनिधी या नात्याने वरोरा-भद्रावती तालुक्यातील एकही गाव अंतर्गत रस्त्याशिवाय राहणार नाही. गावातील शंभर टक्केअंतर्गत रस्ते येत्या काळात करून या मतदारसंघाचा चौफेर विकास करण्यास कटिबद्ध असल्याची ग्वाही आमदार प्रतिभा धानोरकर यांनी दिली.

वरोरा-भद्रावती मतदार संघातील १५ कोटी ७९ लक्ष ३७ हजारांच्या ३१ कामांची सुरुवात करण्यात झाली. या कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी भद्रावती नगर परिषदेचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर, उपविभागीय अधिकारी बावनकुळे, साहाय्यक अभियंता सायली कदम, मयूरी दोहतरे, प्रमोद मगरे, बसंत सिंग, प्रशांत काळे, सुधीर मुडेवार, भोजराज झाडे, चंदू दानव, प्रदीप घागी, बाळू चिंचोळकर, सुरेश गावंडे, सुधाकर रोहणकर, भानुदास ढवस उपस्थित होते.

190821\img-20210818-wa0201.jpg

वरोरा- भद्रावती मतदार संघात 15 कोटी 79 लक्ष 37 हजार रुपयांच्या 31 कामांची सुरुवात झाली या प्रसंगी उपस्थित आमदार प्रतिभा धानोरकर

Web Title: No village can live without internal roads: Pratibha Dhanorkar