शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीच्या प्रवेशाचे ‘नो टेन्शन’

By admin | Updated: June 22, 2017 00:35 IST

आठ दिवसांपूर्वी दहावीचा निकाल लागला. त्यामुळे अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली आहे.

उत्तीर्ण विद्यार्थ्यांपेक्षा जागा जास्त : शहरातील महाविद्यालयांना विद्यार्थ्यांची अधिक पसंतीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आठ दिवसांपूर्वी दहावीचा निकाल लागला. त्यामुळे अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू झाली आहे. विद्यार्थी विविध कागदपत्रांची जुळवाजुळव करीत आहेत. मोठ्या शहरांमध्ये अकरावीसाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात असल्याने आपल्याला हवे त्या महाविद्यालयात प्रवेश मिळणार की नाही, याबाबत विद्यार्थ्यांत चिंता पसरली आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात उलट स्थिती असून महाविद्यालयस्तरावर अकरावीला थेट प्रवेश दिला जात आहे. तर दहावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपेक्षा प्रवेश क्षमता जास्त असल्याने अकरावीला प्रवेशाचे ‘नो टेन्शन’ असे म्हणण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. ४४४सध्या सर्वच अभ्यासक्रमाचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यामुळे सर्वच शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी अकराव्या वर्गाचा प्रवेश महत्त्वाचा माणला जातो. त्यामुळे अनेक विद्यार्थी अकरावीत प्रवेश घेताना कला, वाणिज्य, कामर्स, विज्ञान अशा शाखांची निवड करतो. तर काही विद्यार्थी औद्योगिक प्रशिक्षणाला महत्त्व देतात. येथूनच विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गुणवत्तेला नवे वळण मिळत असते. आठ दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या दहावीच्या शालांत परीक्षेत जिल्ह्यातून २६ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर जिल्हाभरात अकरावीचे २३४ कनिष्ठ महाविद्यालये असून २७० तुकड्या कला शाखेच्या, विज्ञान शाखेच्या १३८ तुकड्या, तर वाणिज्य शाखेच्या ३० तुकड्या आहेत. या तुकड्यांची प्रत्येकी ८० अशी प्रवेश क्षमता असून ३५ हजार २८० विद्यार्थ्यांना सहज प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे शिक्षण विभागाने म्हटले आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांची शहरी भागाकडे धाव दहावीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ग्रामीण भागात जास्त आहे. शहरी विद्यार्थ्यांच्या बरोबरीने अनेक ग्रामीण विद्यार्थ्यांनी गुण मिळविले असून अकरावीच्या प्रवेशासाठी ते आता शहरातील महाविद्यालयांना पसंती देत आहेत. त्यामुळे प्रवेशासाठी काहीसी अडचण निर्माण होत असून गुणानुक्रमे प्रवेश दिला जात असल्याचा प्रकार काही कनिष्ठ महाविद्यालयात सुरू आहे. प्रसिद्ध व चांगल्या महाविद्यालयात आपल्याला प्रवेश मिळावा, असे प्रत्येक विद्यार्थ्याला वाटत असले तरी त्या महाविद्यालयात क्षमते इतक्याच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळते. तेव्हा अनेकांची हिरमोड होत आहे. ग्रामीण भागातील कनिष्ठ महाविद्यालयात मात्र वेगळी स्थिती आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांचा विविध क्षेत्राकडे कल२० दिवसांपूर्वी बारावीच्या परीक्षेचा निकाल लागला. त्यामुळे वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची धावपळ सुरू आहे. यामध्ये अनेकांनी अभियांत्रिकी, कला, विज्ञान, आयटीआय, पॉलीटेक्नीक अभ्यासक्रमाची निवड केली असून प्रवेशासाठी तशी तयारी चालवली आहे. अनेकांचे प्रवेश निश्चीत झाले आहेत. दहावीत उत्तीर्ण झालेल्यांपेक्षा अकराव्या वर्गाची जिल्ह्याची प्रवेश क्षमता जास्त आहे. मोठ्या शहरांमध्ये आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात महाविद्यालयस्तरावर थेट प्रवेश मिळत असल्याने प्रवेशासंबधी विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण नाही. - संजय डोर्लीकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)जिल्हा परिषद, चंद्रपूर.