हेल्मेट नसेल तर आरटीओ कार्यालयात नो एंट्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:42 IST2021-02-05T07:42:22+5:302021-02-05T07:42:22+5:30

आरटीओचे सक्त पाऊल : १ फेब्रुवारीपासून हेल्मेट अनिवार्य चंद्रपूर : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यांना तसेच कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या प्रत्येकालाच ...

No entry in RTO office without helmet | हेल्मेट नसेल तर आरटीओ कार्यालयात नो एंट्री

हेल्मेट नसेल तर आरटीओ कार्यालयात नो एंट्री

आरटीओचे सक्त पाऊल : १ फेब्रुवारीपासून हेल्मेट अनिवार्य

चंद्रपूर : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यांना तसेच कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या प्रत्येकालाच हेल्मेट अनिवार्य करण्यात आले आहे. १ फेब्रुवारीपासून विनाहेल्मेट कुणालाही प्रवेश देण्यात येणार नसल्याचे सक्त पाऊल नव्यानेच नियुक्त झालेले उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी उचलले आहे.

मागीलवर्षी झालेल्या अपघातात मृतकांच्या संख्येत विनाहेल्मेट असणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे जिल्ह्यात महामार्गावर हेल्मेट सक्ती केली आहे. रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालय तसेच वाहतूक कार्यालयातर्फे याबाबत विविध उपक्रमांतून जनजागृती करण्यात येत आहे. प्रजासत्ताक दिनाचे ओचित्य साधून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांच्या हस्ते हेल्मेटचे वितरण करण्यात आले. यावेळी सर्व कर्मचाऱ्यांना दुचाकीने कार्यालयात येताना १ फेब्रुवारीपासून हेल्मेट अनिवार्य करण्यात आले. विनाहेल्मेट परवानगी देण्यात येणार नाही, अशा सूचनाही यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी दिल्या आहेत.

Web Title: No entry in RTO office without helmet