शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
2
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
3
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
4
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
5
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
6
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
7
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
8
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
9
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
10
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
11
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
12
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
13
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
14
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
15
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
16
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
17
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
18
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
19
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
20
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
Daily Top 2Weekly Top 5

खरीपासाठी हवे बीटी कापूस बियाणांचे नऊ लाख ८६ हजार पाकीट्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील ७० टक्के जनता आजही शेतीवर अवलंबून आहे. कोरोना निर्बंधांमुळे यंदाही विविध व्यवसाय बंद पडले. सुमारे दीड हजार कोटींचे व्यवहार अडचणीत सापडले. १५ मे पर्यंत निर्बंध कायम असल्याने संकटे पुन्हा वाढतील. खरीप मशागत थांबली नाही.  त्यामुळे कृषी विभागानेही भात, विविध कडधान्ये, तसेच कापूस व सोयाबीन लागवडीचे वाढीव क्षेत्र लक्षात घेतले.

ठळक मुद्दे कोरोनाचा कहर असतानाही खरीप मशागतीला वेग

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना उद्रेक रोखण्यासाठी लागू केलेल्या निर्बंधांमुळे शेतमालाची साखळी तुटली, तर दुसरीकडे खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जि. प. कृषी विभागाने तब्बल नऊ लाख ८६ हजार ४४४ पाकीटस्‌ बीटी कापूस बियाणांची डिमांड राज्याच्या कृषी आयुक्तांकडे केली आहे. मागील वर्षी कोरोना लॉकडाऊन काळात कृषी क्षेत्राचा अपवाद वगळल्यास मोठ्या उद्योगांसह  सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना प्रचंड फटका बसला होता. जिल्ह्यातील बहुतांश उद्योगांना टाळे लागले असताना कृषी क्षेत्राने मात्र उत्पादनात आघाडी घेतली होती. त्यामुळे जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळाला होता. जिल्ह्यातील ७० टक्के जनता आजही शेतीवर अवलंबून आहे. कोरोना निर्बंधांमुळे यंदाही विविध व्यवसाय बंद पडले. सुमारे दीड हजार कोटींचे व्यवहार अडचणीत सापडले. १५ मे पर्यंत निर्बंध कायम असल्याने संकटे पुन्हा वाढतील. खरीप मशागत थांबली नाही.  त्यामुळे कृषी विभागानेही भात, विविध कडधान्ये, तसेच कापूस व सोयाबीन लागवडीचे वाढीव क्षेत्र लक्षात घेतले. त्यानुसारच कृषी आयुक्तांकडे जिल्ह्यासाठी ६ लाख ७१ हजार २० मेट्रिक टन बियाणांची मागणी नोंदविण्यात आली आहे.

बोंडअळीची साखळी तुटलीच नाहीजिल्ह्यात २०१७ पासून कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढला. तेव्हापासून २०१७ ते २०२० पर्यंत बोंडअळीचे संकट कायम आहे. जिल्ह्यातही गतवर्षी या अळीच्या प्रकोपाने कपाशीचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे बोंडअळीचा जीवनक्रम खंडित करण्यासाठी अन्य उपायांसोबतच हंगामपूर्व लागवड करू नये, असा सल्ला कृषी अधिकाऱ्यांनी दिला आहे.  

जिल्ह्यात एक जूनपासून होणार बियाणे विक्रीशेतकऱ्यांनी हंगामाच्या आधीच कापूस बियाणे लागवड केल्यास बोंडअळीच्या पुनरुत्पत्तीचा धोका आहे. यासाठी शेतकऱ्यांना एक जूनपासून बियाणे विक्री करण्याच्या सूचना कृषी आयुक्तांनी दिल्या. उत्पादक ते कंपनी वितरक, वितरक ते किरकोळ विक्रेता किरकोळ विक्रेता ते शेतकरी असे एक वेळापत्रकच जाहीर केले. त्यामुळे जिल्ह्यात एक जूनपासून अधिकृत बियाणे विक्री सुरू होणार आहे. याच संधीचा गैरफायदा घेण्यासाठी तेलंगणा व आंध्र प्रदेशातून बोगस बियाणे आणून विकणाऱ्या टोळ्या जिल्ह्यात सक्रिय झाल्याचा अंदाज आहे.  

 

टॅग्स :agricultureशेती