शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
3
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
4
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
5
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
6
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
7
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
8
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
9
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
10
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
11
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
12
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
13
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
14
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
15
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
16
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
17
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
18
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
19
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
20
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
Daily Top 2Weekly Top 5

आजाराची माहिती कदापि लपवून ठेऊ नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 05:00 IST

आपत्कालीन परिस्थितीत उद्रेक झाल्यास करावयाच्या उपाययोजनांची मॉकड्रील जिल्हाधिकारी व प्रमुख अधिकार यांच्या उपस्थितीत पार पडले. जिल्हा येणाºया कोणत्याही परिस्थितीला सामना देण्यास तयार आहे. कोणतीही उणीव राहू नये, यासाठी प्रशासन प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी जिल्हातील नागरिकांची संवाद साधताना स्पष्ट केले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन : २१४ वाहने ताब्यात, ३५ अटकेत

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यामध्ये एकही पॉझिटीव्ह रूग्ण नाही. मात्र कोणीही आपला आजार लपवून ठेवू नका, रूग्णाची तपासणी करण्याची संपूर्ण तयारी जिल्ह्यात आहे. त्यामुळे पुढील काळात घराच्या बाहेर निघावे लागणार नाही असे आठवडाभराचे नियोजन करा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.आपत्कालीन परिस्थितीत उद्रेक झाल्यास करावयाच्या उपाययोजनांची मॉकड्रील जिल्हाधिकारी व प्रमुख अधिकार यांच्या उपस्थितीत पार पडले. जिल्हा येणाºया कोणत्याही परिस्थितीला सामना देण्यास तयार आहे. कोणतीही उणीव राहू नये, यासाठी प्रशासन प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी जिल्हातील नागरिकांची संवाद साधताना स्पष्ट केले.नवीन आदेशानुसार केवळ जीवनावश्यक वस्तू विक्रीमध्ये भाजीपाला, किराणा सामान, दूध, ब्रेड, अंडी, मांस, मासोळी, बेकरी, पशुखाद्याची दुकाने, सिलिंडर पुरवठा करणारी यंत्रणा सकाळी सात ते दुपारी दोन या वेळेत सुरू राहणार आहे. या काळात अन्य कोणतीही व्यापारी प्रतिष्ठान सुरू करण्यास मज्जाव आहे. इलेक्ट्रीकल व अत्यावश्यक दुरूस्तीसंदर्भात कारागिरांनी घरी जाऊन सेवा द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले.परराज्यातील १० हजार ९९४ नागरिक निगरानीतजिल्ह्यामध्ये विदेशातून आलेल्या एकाही नागरिकांची तपासणी शिल्लक नाही. २०४ नागरिकांची तपासणी पूर्ण झाली आहे. एकाही नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह नाही. जिल्ह्यामध्ये अन्य राज्यातून अन्य जिल्ह्यातून आलेल्या २६ हजार २६ नागरिकांची नोंद झाली. यापैकी १० हजार ९९४ नागरिक सध्या निगराणीत आहे.याशिवाय १४ दिवस होम क्वारंटाईन झालेल्या रुग्णांची संख्या १५ हजार ३२ आहे. इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन रुग्णांची संख्या २० आहे.

श्यामनगरातील रास्तभाव दुकान सीलचंद्रपूर : शहरातील श्यामनगर येथील जीवन विकास कल्याण संस्थेद्वारे संचालित रास्त भाव दुकानदार सविता सपना राय यांनी कार्डधारकांना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत शिधात्रिकाधारकांना निर्धारीत वाटप परिमाणापेक्षा कमी धान्य दिल्याने बुधवारी पुरवठा विभागाने दुकानाला सील ठोकले.अनावश्यक बँक व्यवहार टाळाबँकेमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याचे मंगळवारी दिसून आले. त्यामुळे आवश्यकता नसताना बँकेचा व्यवहार टाळण्याचा सल्ला जिल्हा प्रशासनाने दिला आहे. फारच गरज असेल तर सामाजिक दुरी राखून व्यवहार करावा. गंजवार्डातील भाजीपाला बाजाराला कोहिनूर मैदानामध्ये सुरू आहे. याशिवाय काही ठिकाणी जीवनावश्यक वस्तूची विक्री आहे. प्रत्येक दुकानदाराने आपल्या दुकानासमोर हात धुण्याची व सॅनीटायझरची व्यवस्था करावी, असेही स्पष्ट केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या